Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवराय साकारलेल्या ’या’ अभिनेत्यांना पूजतात!
‘छावा’ (Chhaava) चित्रपटामुळे सध्या पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची लाट प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये येईल असं वाटतंय… छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) अक्षरश: छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जगला आहे… देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक विकीच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत… कारण ऐतिहासिक काळातील व्यक्तिरेखेची भूमिका साकारणं सोप्पं नाही, त्याचं व्यक्तिमत्व आत्मसात करुन ते सादर करणंही तितकंच गरजेचं असतं आणि विकीने ते केलं आहे… आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही बऱ्याच कलाकृती झाल्या आणि अनेक कलाकारांनी त्या अभिनयातून उत्तम साकारल्याही. पण तुम्हाला माहित आहे का? मराठीतील दोन कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका साकारली त्यासाठी अनेक मराठी घरांमध्ये चक्क त्यांनी साकारलेल्या शिवरायांचे फोटो ठेवून त्यांची पूजा केली जाते.. कोण आहेत ते कलाकार जाणून घेऊयात…

आत्तापर्यंत मराठी नाटक, मालिका किंवा चित्रपटांमध्ये शंतनू मोघे, चिन्मय मांडलेकर, डॉ. अमोल कोल्हे, सुबोध भावे, शरद केळकर, महेश मांजरेकर, गश्मीर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे… पण अजूनही छत्रपती शिवरायांची सर्वोत्कृष्ट भूमिका कुणी साकारली असं विचारलं तर आपसूकच चंद्रकांत मांढरे आणि सुर्यकांत मांढरे ही दोन नावं येतात… मराठी चित्रपटांच्या ब्लॅक अॅंड व्हाईट काळात आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये या दोन्ही कलाकारांनी शिवराय (Chhatrapati Shivaji maharaj) साकारले होते… त्यांनी इतके तंतोतंत छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते की आजही काही मराठी घरांमध्ये सुर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे यांचे शिवरायांच्या भूमिकेतील फोटो ठेवून त्यांनी पूजा केली जाते.. (Marathi historical movies)
===========================
हे देखील वाचा: Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
===========================
पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे कोण? तर, कोल्हापूरातील तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याची चंद्रकांत आणि सुर्यकांत ही दोन मुलं…चंद्रकांत मांढरे हे सुर्यकांत यांचे मोठे बंधु.. भालजी पेंढारकर यांच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटात चंद्रकांत मांढरे यांनी शिवराय साकारले होते.. याशिवाय,चंद्रकांत यांनी युगे युगे मी वाट पाहिली, छत्रपती शिवाजी, संथ वाहते कृष्णामाई, खंडोबाची आण, बनगरवाडी अशा अनेक चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या…चंद्रकांत केवळ अभिनेते नव्हते तर ते एक उत्तम चित्रकारही होते… कोल्हापूरातील त्यांचं राहतं घर वस्तु संग्रहालयात रुपांतरित केलं आहे…(Untold story)

आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सुरु आहे आणि काही किस्सा नसेल असं होईल का?… तर, चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दलचा एक किस्सा सोशल मिडीयावर व्हायर झाला होता… एक फोटो शेअर करण्यात आला होता ज्यात चंद्रकांत मांढरे छत्रपतींच्या भूमिकेसाठी तयार होताना दिसत आहेत.. (Entertainment news)
या पोस्टमध्ये लिहिलं होतं.. ‘पन्हाळ्यावर ‘छत्रपती शिवाजी’ या भालजी पेंढारकरांच्या (Bhalji Pendharkar) चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. घोड्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावर ते घोडे दोन पाय वर करुन थांबतात, असा तो सीन होता. घोडे नेहमीचे सवयीचे होते. चंद्रकांत यांनाही घोड्यावर बसण्याची चांगली सवय होती. दोन-तीन वेळा शॉट रिटेक झाला तरी भालजींचं समाधान होत नव्हतं. घोडा जोरात दौडत येत होता. बरोबर ऐन कड्यावर थांबत होता. पण माझ्या चेहऱ्यावर जे भाव हवे होते, ते काही भालजींना मिळत नव्हते. माझ्याही मनात एक सुक्ष्म भीती तरळत होती न जाणो घोडे थांबले नाही तर ? मी आणि घोडा दोघेही कड्यावरुन खाली ! नेमकी तिच भावना माझ्या चेहऱ्यावर शॉटच्या वेळी येत होती. भालजींच्या ते लक्षात आलं ते बसल्या जागीच ओरडले, ‘चंद्रकांत , घाबरु नकोस ; मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील.’ मी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात होतो. त्या शब्दांनी काय जादू झाली, कुणास ठाऊक. पण पूढच्याच टेकला शॉट ओके झाला. (Bollywood movies)
===========================
हे देखील वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj : ‘या’ कलाकारांनी साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
===========================
आता चंद्रकांत यांचे बंधु सुर्यकांत मांढरे.. त्यांनी यांनी वयाच्या १२व्या वर्षी ध्रुव या चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली…. १९४३ मध्ये शिवचरित्रातील गुप्तहेर बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बालशिवाजीही भूमिका केली… आणि त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीला दोन असे अभिनेते लाभले ज्यांनी साकारलेल्या शिवरायांच्या भूमिकेपुढे कुठल्या दुसऱ्या कलाकाराची भूमिका तितक्या ताकदीची आजवर वाटली नाही… (Chandrakant And Suryakant Mandhare)
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास खरं तर एका चित्रपटात मावेल इतका तुटक नाही आहे.. कितीही खंड आले तरी त्यांचं कार्य अडीच तासात मावणारं नाही आहे.. मात्र, तरीही अनेक कलाकार त्यांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी चित्रपटरुपात समोर घेऊन येताना दिसत आहेत.. लवकरच, रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटातून शिवरायांचं कार्य चित्रपटरुपात घेऊन येणार असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि शिवराय साकारण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे.. तर ‘द प्राईड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ (The Pride Of Bharat : Chattrapati Shivaji Maharaj) हा संदीप सिंग दिग्दर्शित ऐतिहासिकपट लवकरच येणार असून यात ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे…(Historical Bollywood movies)
रसिका शिंदे-पॉल