Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चंदू….मी आलोय…

 चंदू….मी आलोय…
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

चंदू….मी आलोय…

by सई बने 28/04/2020

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ चित्रपट 1 मे, या महाराष्ट्रदिनी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच चित्रपटाच्या प्रोमोनी उत्सुकता वाढवली आहे. मार्चमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. वास्तविक चंदू मी आलोय…. या वाक्यानं चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 

एबीसीडी मध्ये अमिताभ बच्चन आहेत. मराठी चित्रपटात बिग बी च्या भूमिकेची मोठी उत्सुकता आहे. बिग बी बरोबर विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्याही देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हिंदी चित्रपट सृष्टीत जस अमिताभ बच्चन यांचं नाव मानानं घेतलं जातं तसंच मराठी अभिनेत्यांमध्ये विक्रम गोखले यांच्या नावाचा दबदबा आहे. हे दोन दिग्गज ‘एबी आणि सीडी’ या चित्रपाटत एकत्र येत आहेत. अग्निपथ या चित्रपाटात 1990 मध्ये एकत्र आले होते. त्यानंतर ही दिग्गज अभिनेत्यांची जोडी या मराठी चित्रपटात एकत्र पहाता येणार आहे…

या चित्रपटाची कथा सहज सोप्पी आहे. आपल्या आसपास घडणारी आहे. तुमच्या आमच्या परिचयाची आहे. आणि म्हणूनच ती आपल्याला खेचून घेते. एबी म्हणजे अमिताभ बच्चन  आणि सीडी म्हणजे चंद्रकांत देशपांडे.

चंद्रकांत देशपांडे चित्रकार पुण्यात राहणारे देशपांडे कुटुंब हे जरा शिस्तप्रिय. या कुटुंबात आजोबा, त्यांचीदोन मुलं, सुना आणि दोन नातवंडं अशी मंडळी आहेत. आता एकत्र कुटूंब असलं तरी प्रत्येकाची मतं वेगवेगळी. त्यात 75 वर्षाचे चंद्रकांत देशपांडे एकाकी पडल्यासारखे झाले होते. तरीही इथे आजोबा आणि नातवाचं अनोखं नातं फुललेलं आहे. जसजसं म्हातारपण येतं तसतसं कुटुंबात या वृद्ध व्यक्ती या अडचणवाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा आधार म्हणून नातवंड काम करतात. या चित्रपटात नातवाची भूमिका केली आहे, विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा अक्षय टंकसाळे याने. चित्रपटात तो आपल्याला विक्की देशपांडे म्हणून भेटतो. विक्रम गोखलेंचा नातू आजोबा आणि विक्की यांचं नातं मित्रत्वाचं फॉर्मल नातं नाही दोघं आपल्या अडीअडचणी एकमेकांबरोबर शेअर करीत होते. दोन पिढ्यांच्या या मैत्रीतील गम्मत पडद्यावर बघण्यासारखी आहे. हा विक्की त्याची मैत्रिण गार्गी हे आजोबांना कशी मदत करतात याची ही कथा आहे.

चित्रकार असलेल्या आजोबांची चित्र त्यांच्याच घरात जुनी होऊ लागतात, तेव्हा त्यांना आपले कुटुंबातील स्थान समजते. ही खंत त्यांच्या मनाला जाणवत असतांनाच एक पत्र त्यांना येते.  त्यांच्या मित्राच कोणी साधासुधा मित्र नाही, तर तो आहे अमिताभ बच्चन मग काय, अमिताभ आणि देशपांडे यांची मैत्री आहे, ही गोष्ट सर्वत्र होते. हे एक साधेसे पत्र त्यांना घरात पुन्हा फॅमिली हेडच्या भुमिकेत आणते. बाहेर त्यांचे महत्त्व वाढते. जिथे गेले तिथे त्यांना अमिताभ बरोबरचे किस्से विचारले जाऊ लागले…

मग एका कार्यक्रमाला अमिताभला बोलवण्यात येते. अमिताभकडूनही या कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारल्याचे पत्र येते या कार्यक्रमाची तयारी सुरु होते.मोठ्या हॉलमध्ये चंद्रकांत देशपांडेंच्या नावाने अमिताभ बच्चन यांना भेटायला आलेल्यांची गर्दी झालेली असते असे असूनही अमिताभ बच्चन यांचा काही पत्ता नसतो.मग स्वतः चंद्रकांत देशपांडेच जाहीर करतात अमिताभ बच्चन येणार नाहीत या त्यांच्या वाक्यावर अनेक जण नाराज होतात कुजबूज वाढते तितक्यात आवाज येतो. चंदू…. मी आलोय रे… हा नक्की कोणाचा आवाज की खराखुरा अमिताभ बच्चन…. हे मात्र प्रत्यक्षात चित्रपटात बघण्यासारखे आहे.

मंडळी आता या लॉकडाऊनच्या काळात एबीसीडी सर्वांसाठी मोठं गिफ्ट ठरणार आहे. अगदी नवा कोरा चित्रपट. तोही दोन बड्या कलावंतांचा आपल्याला आपल्या घरात बसून बघता येणार आहे.  या संधीचा फायदा घ्या. छान चित्रपटगृहात बसल्याचे फिल करा आणि आपल्याच घरी, आपल्या कुटुंबासह अमितजी आणि विक्रम गोखले या दोन दिग्गजांच्या जुगलबंदीची मजा घ्या.

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured Marathi Movie movies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.