Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय”
जगभरातील फिल्मी जगातील मानाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिवल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये (Cannes Film Festival 2025) यंदा ४ मराठी चित्रपटांचं स्पेशल स्क्रिनिंगही होणार आहे. हा फिल्म फेस्टिवल जितका जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकाच कलाकारांच्या हटके फॅशनसाठीही नावाजला जातो. बऱ्याच वर्षांपासून अनेक भारतीय कलाकार कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर आपली संस्कृती जपत फॅशनेबल स्टाईलने हजेरी लावतात. २४ मे २०२५ पर्यंत सुरु असणाऱ्या या फिल्म फेस्टिवला दुसऱ्यांदा मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम (Chaya Kadam) यांनी हजेरी लावली असून या जागेशी जुनी ओळख असल्यासारखं वाटत आहे अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे.(Entertainment news)
छाया कदम यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावल्याचा भावनिक अनुभव शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की,”२०२५ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता. त्यावेळी अगदी नवखी असल्या सारखी वावरत होते. काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतलं होतं. पण ते ही मी एन्जॉय केलं होतं. यावर्षी ही जागा – हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं आपलं वाटतंय. इथल्या रस्त्यांसोबत – इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्या सारखं वाटतंय”. (Entertainment)

पुढे छाया यांनी लिहिलंय की, “गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हलमुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या Snow Flower च्या स्क्रिनिंगची.” (Bollywood tadaka)
============================
============================
दरम्यान, १३ ते २४ मे २०२५ या काळात कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे. ७८ व्या या फेस्टिवलमध्ये जगभरातील विविध भाषांमधील चित्रपटांचं स्क्रिनिंग होणार असून प्रत्येक चित्रपटांना जागतिक दर्जा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप नक्कीच मिळणार आहे. (Cannes Film Festival)