
Chhaava Movie : ‘त्या’ भूमिकेसाठी सखी म्हणते,“तुझा द्वेष करू की…”
सगळीकडे सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे छावा. अभिनेता विकी कौशल याने साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेक्षकांच्या नजरेसमोरून हटत नाहीयेत. शिवाय लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन हा ऐतिहासिकच अजरामर करतो. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसले. त्यापैकी दोन कलाकार विशेष लक्षात राहिले कारण त्यांनी जी पात्र साकारली आहेत त्यांच्यामुळे छत्रपती संभाजी राजे पकडले गेले. गणोजी आणि कान्होजी या भूमिकेत सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशी दिसले. जितकी चर्चा चित्रपटाची होतेय तितकीच चर्चा या दोघांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे होत असून त्यांना लोकांचा रोष देखील पत्करावा लागतोय. आणि याच भूमिकेमुळे चक्क सुव्रत जोशीने कान पकडून माफी मागण्याची वेळ आलीये आणि बायकोने म्हणजेच सखी गोखलेनाही एक खास पोस्ट केली आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे पोस्टमध्ये…. (Chhaava movie)
‘छावा’ प्रदर्शित झाला तेव्हा सुव्रत बायको सखी (Sakhi Gokhale) सोबत परदेशात होता. आता भारतात आल्यावर त्याने सखीबरोबर हा चित्रप पाहिला. आणि त्यानंतर सखीने सुव्रतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सखी लिहिते, ““सिनेमात तुमचं काम एवढं व्यवस्थित करा की तुमची बायको द्विधा मनस्थितीत सापडली पाहिजे… तू इतकं छान काम केलं आहेस म्हणून तुझं कौतुक करू की तुझी भूमिका पाहून तुझा द्वेष करू? याच विचारात मी पडले आहे…सुव्रत कलाकार म्हणून तुझा खूप खूप अभिमान वाटतो.” या पोस्टसोबत सखीने सुव्रतने ‘छावा’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचे फोटो देखील शेअर केले असून, या कोलाजमध्ये सुव्रत ‘छावा’च्या (Chhaava movie) पोस्टरच्या बाजूला उभा राहून कान धरल्याचं पाहायला मिळतंय. (Entertainment mix masala)

‘छावा’ चित्रपटात खरं तर प्रत्येक सीन्स अंगावर शाहिरी आणणारे आहेत. पण ज्यावेळी औरंगजेब शंभु राजांना कैद करतो आणि पुढे गडणारा सगळाच क्रम डोळ्यांमधील अश्रु थांबूच देत नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर केवळ भयाण शांतता जाणवते आणि आपल्या राजाने किती सोसले असेल याचीा विचार करुन मन हेलावून जातं. छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलु मांडण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा विचार खरंच कौतुकास्पद आहे. आणि परिणामी ’छावा’ (Chhaava Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. चित्रपटात Vicky Kaushal, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, किरण करमरकर, अक्षय खन्ना असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. (Bollywood masala)
===========
हे देखील वाचा : Laxman Utekar: छावा निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत
===========
‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट देशभरात आपला डंका वाजवतोय. मराठीच काय अमराठी प्रेक्षकांशी आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करतायत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १२ दिवसांत छावा चित्रपटाने ३६३.३५ कोटींची कमाई करत यशस्वीरीत्या दुसऱ्या आवड्यातही छप्पर फाड कमाई केली आहे. १२ व्या दिवसाच्या कमाईची यापुर्वी आलेल्या चित्रपटांच्या कमाईसोबत तुलना केल्यास कल्की २८९८ एडी आणि अॅनिमल या दोन्ही चित्रपटांना ‘छावा’ने मागे टाकलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कल्की’ चित्रपटाने १२व्या दिवशी १०.०४ कोटी, ‘अॅनिमल’ने १२.७२, तर ‘बाहुबली २’ ने १५.७५ कोटी कमावले होते. आणि ‘छावा’ने १२व्या दिवशी १८ कोटींची कमाई केलीये. दरम्यान, जगभरातील कमाईची आकडेवारी छावा चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे पार कधीच केली आहे. (Box office collection)