IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
सध्या चित्रपटगृहात केवळ “हर हर महादेव” आणि “छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो” हाच जयजयकार ऐकू येतोय. त्याचं कारणही तितकंच खास आहे; नुकतीच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने ऑफिशिअली ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने चौथ्या आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढत ५०२.७० कोटींची कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ‘बाहुबली २’, ‘पुष्पा २’ (हिंदी), ‘जवान’, ‘स्त्री २’, ‘गदर २’, ‘पठान’ यांच्या पंगतीत समावेश झाला आहे. (Chhaava box office)

तरन आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८९.१८ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटी, चौथ्या आठवड्यात अखेर ५०२.७० कोटींची यशस्वी कमाई केली असून आता पुढची वाटचाल ६०० कोटींकडे सुरु केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘छावा’ चित्रपट तेलुगू भाषेतही रिलीज झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.६३ कोटी कमावले आहेत. महत्वाचं म्हणजे विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या दोघांचाही हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. (Entertainment update)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
‘छावा’ ला बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण सध्या सलमान खान आणि रश्मिका मंदानाच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार नाहीये. त्यामुळे २८ मार्च ‘सिकंदर’च्या रिलीजपर्यंत ‘छावा’ थिएटरमध्ये ५ आठवडे नक्कीच पुर्ण करेल. बरं, त्यातही प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद असाच मिळत राहिला तर विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) सलमानच्या ‘सिकंदर’लाही मागे टाकण्याची शक्यता टाळता येत नाही.(Salman Khan’s Sikandar movie)