Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
मागील दोन आठवड्यांपासून छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chatrapati Sambhaji Maharaj) शौर्य छावा या सिनेमाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आले आहे. पूर्वी फक्त मराठी माणसांना आणि इतर थोड्याफार लोकांना माहित असलेला संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम आज संपूर्ण जगाला या सिनेमामुळेच समजत आहे. त्यामुळे हा सिनेमा सर्वच मराठी लोकांसाठी खूपच जवळचा आहे. (Chhaava)
सिनेमामध्ये शंभू महाराजांचे जीवन चरित्र अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलेले असल्याने मराठीसोबतच इतर लोकांना देखील हा सिनेमा भावात आहे. कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच, चित्रपटाची कथा, संगीत, कलाकारांची वेशभूषा, संवाद, लोकेशन सर्वच गोष्टी कमालीच्या गाजताना आणि चर्चेत येताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला या सिनेमाचे शूटिंग नक्की कुठे झाले त्या लोकेशनबद्दल माहिती देणार आहोत. (Bollywood Tadka)
वाई
महाराष्ट्राच्या सातारा (Satara) जिल्ह्यामधील वाईमध्ये (Wai) असलेल्या मेणवली घाटात या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. कृष्णा नदीकाठी वाई नावाचे गाव आहे. या गावी छावा चित्रपटाचे अनेक सीन शूट झाले असून खासकरून चित्रपटाच्या लढाईचे सर्व दृश्य येथेच शूट झाले आहेत. याच ठिकाणी गणोजी आणि कान्होजी शिर्के मुघलांसोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात फितुरी करतात. याच ठिकाणी महाराजांना साखळदंडाने बंदिस्त करतात असे दाखवले आहे. (Entertainment Mix Masala)

======
हे देखील वाचा : Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली
======
बारामोटेची विहीर
छावा सिनेमातील अतिशय लक्षवेधी आणि स्मरणात राहणारे एक दृश्य म्हणजे, राज्याभिषेकाच्या आधी छत्रपती संभाजी महाराज शिवलिंगाची पूजा करत दुग्धाभिषेक करतात असा एक सीन आहे. हा सीन बारामोटेची विहीर (Baramotechi vihir) या ठिकाणी चित्रित झाला आहे. बारामोटेची विहीर या ठिकाणाचे ऐतिहासिक मोठे महत्व आहे. ही ऐतिहासिक विहीर साताऱ्याजवळील लिंब या गावात असून या ठिकाणाला ३०० वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे. लिंब या गावातच ही ऐतिहासिक विहीर आहे. इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी असलेल्या वीरुबाई यांनी ही विहीर बांधली. ही विहीर १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद आहे. आजही ही विहीर येथील गावकऱ्यांसाठी पाण्याचा मोठा आणि उत्तम स्रोत आहे. मुख्य म्हणजे ३०० वर्षात ही विहीर एकदाही कोरडी झालेली नाही. (Chhaava News)

मालाडमधील मढ
चित्रपटांत जेव्हा छत्रपती संभाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन औरंगजेबाने वसवलेल्या गावावर आक्रमण करून तेथील सोने, चांदी आणि त्यासोबतच तेथील प्रत्येक वस्तू काबिज करतानाचे सीन आहेत, त्याचे शूटिंग मालाडमधील मढ या गावात झाले आहे. छावा चित्रपटातील अनेक सीन्सचे शूटिंग हे मुंबईतील अनेक फिल्म स्टुडिओमध्ये झालेलं आहे. (Marathi Top Stories)
पुणे
पुण्यातील काही ऐतिहासिक किल्ले आणि शाही राजवाडे तुम्ही छावा चित्रपटामध्ये पाहू शकता. शहराचा आर्किटेक्चरल वारसा या चित्रपटात चित्रित केलेल्या मराठा साम्राज्याच्या भव्यतेशी उत्तम प्रकारे पूरक आहे. त्यामुळे चित्रपटातील अनेक मुख्य भागाचे शूटिंग पुण्यातील विविध ठिकाणांवर पार पडेल. (Marathi Latest News)

कर्जत आणि महाबळेश्वर
कर्जतमधील अनेक फिल्म स्टुडिओ आणि येथील निसर्गरम्य लँडस्केप हे ऐतिहासिक चित्रपटांच्या शूटिंगसाठी पूरक वातावरण निर्माण करतात. त्यामुळे छावा चित्रपटाच्या काही भागांचं शूटिंग कर्जतमधील प्रसिद्ध स्टुडिओ आणि ठिकाणांवर पार पडेल. हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या आणि धुक्यांनी झाकलेल्या अनेक टेकड्या तुम्ही छावा या चित्रपटामध्ये पाहू शकता. बारामोतीची विहीर या ठिकाणाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन असणाऱ्या या ठिकाणी पर्यटनाची अनेक ठिकाण प्रेक्षकांचं आकर्षण ठरतात.(Chhaava Movie Shooting Location)
======
हे देखील वाचा : Milind Gawali : “माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं….” मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना
======
दरम्यान छावा सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना अभिनित या सिनेमाने आतापर्यंत ६०८ कोटींचा तगडा बिजनेस केला आहे. तिसऱ्या आठवड्यात देखील या सिनेमाची यशस्वी घोडदौड चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा सिनेमा नक्कीच अधिक बिजनेस करेल असे जाणकार सांगताना दिसत आहे.