
Chhaava छावा सिनेमातील ‘आया रे तुफान’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर क्षितीज पटवर्धनची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य सगळ्यांना सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा‘ (Chhaava) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना (Vicky Kaushal and Rashmika Mandana) यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. ‘छावा’च्या अतिशय प्रभावी ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली असून, सगळ्यांनाच आता सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमातील गाणी देखील प्रदर्शित होत आहे. नुकतेच सिनेमातील ‘आया रे तुफान’ (Aaya Re Tufan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Chhaava)
‘आया रे तुफान’ या गाण्याची सध्या कमालीची चर्चा होताना दिसत आहे. ए आर रेहमान (A. R. Rehmaan) आणि मराठी मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) यांनी हे सुंदर गाणे गायले असून, ए आर रेहमान यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे सर्वत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे मराठी लेखकाने लिहिले आहे. ‘आया रे तुफान’ हे छावा मधील गाणे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने लिहिले आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार इरशाद कामिल यांच्या साथीने क्षितिजने हे गाणे लिहिले.
‘आया रे तुफान’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर गीतकार क्षितिज पटवर्धनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून क्षितिजने त्याचा अनुभव आणि त्याच्या या गाण्याबद्दलच्या भावना सांगितल्या आहेत. क्षितिजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “‘छावा’च्या ‘आया रे तुफान’च्या निमित्ताने…आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला “माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रे” गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की, आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली. (Entertainment mix masala)
ए आर रेहमान सरांसह या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या बरोबर लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे. ‘छावा’ मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय “आया रे तूफान!”(Kshitij Patwardhan Post)
“भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान!”
या गाण्याच्या निमित्ताने क्षितिजने पहिल्यांदाच ए आर रहमान यांच्यासोबत काम केले आहे. या पोस्टमधून त्याने सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, ‘या सन्मानासाठी लक्ष्मण उतेकर सर आणि दिनेश विजन सर तुमचे धन्यवाद. माझे आदर्श इरशाद कामिल सरांसोबत माझे नाव पाहणे हीच गोष्ट मला भावुक करत आहे. धन्यवाद’
========
हे देखील वाचा : Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
========
दरम्यान छावा सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबतच नीलकांती पाटेकर, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर, मनोज कोल्हटकर, आशिष पाथोडे आदी अनेक मराठी कलाकारही दिसणार आहेत.