Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट

Vicky kaushal : आया रे तुफान…‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच
सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सूरू आहे आणि तो म्हणजे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने २०२५ च्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड करून आगामी हिंदी चित्रपटांना चॅलेंज दिलं आहे. हिंदी भाषेत धमाकेदार कमाई आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तेलगू भाषेत ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. शिवाय १३ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून ‘छावा’ (Chhaava) लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. जाणून घेऊया ‘छावा’च्या कमाईचं अपडेट. (Vicky Kaushal)

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘छावा’ चित्रपटाने ३८६.२५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ३१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५.२५ कोटी, सहाव्या दिवशी ३२ कोटी, सातव्या दिवशी २१.५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याची कमाई कमवत पहिल्या आठवड्याची कमाई २१९.२५ कोटी झाली होती. त्यानंतर आठव्या दिवशी २३.५ कोटी, नवव्या दिवशी ४४ कोटी, दहाव्या दिवशी ४० कोटी, अकराव्या दिवशी १८ कोटी, बाराव्या दिवशी १८.५ कोटी, तेराव्या दिवशी २३ कोटी कमवत आतापर्यंत एकूण ३८६.२५ कोटी कमावले आहेत. (Chhaava Box office collection)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून दिग्दर्शक उतेकर यांनी विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना यांना डोळ्यांसमोर ठेवूनच कथा लिहिली होती असं त्यांनी कलाकृती मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव हिंदी चित्रपट आणि प्रेक्षकांवर झालेला दिसतो. पण ‘छावा’ या चित्रपटाची भूरळ दाक्षिणात्य चित्रपट प्रेमींना पडली असून विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जावा अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. आणि आथा त्या मागणीनुसार चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘छावा’ तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात येईल असं जाहीर केलंय. येत्या ७ मार्चला ‘छावा’ तेलुगू प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून लवकरच मराठीतही हा पचित्रपट येईल असे सांगितले जात आहे. (Bollywood update)