Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘या’ कलाकारांनी साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
आज संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांची ३९५ वी जयंती साजरी होत आहे. आभाळालाही कमी वाटेल एवढे मोठे कर्तृत्व करणारे महाराज कायम सर्वच लोकांच्या स्मरणात असतातच. त्यांचे पराक्रम, शौर्य, किस्से, शिकवण, गुण आदी अनेक गोष्ट आपल्यासमोर या ना त्या मार्गानी येतच असतात. महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठमोठे पराक्रम गाजवले. केवळ त्यांच्या नावानेच शत्रूला धडकी भरायची. शत्रूला देखील त्यांचा हेवा वाटावा असे होते आपले महाराज. आजपर्यंत आपण त्यांचे चरित्र, पराक्रम पुस्तकांमधून, जाणकारांच्या तोंडून, चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच ऐकले, वाचले आणि पाहिले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
आजवर महाराजांचे शौर्य चित्रपटांच्या माध्यमातून अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि तो कायमच होत राहील. मालिका आणि चित्रपट या प्रमुख माध्यमातून महाराजांचे स्वराज्याचे कार्य कायम कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला प्रेरणा देत राहील. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटांनी देखील त्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारला. चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आज शिव जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा काही कलाकारांबद्दल ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Role)
शरद केळकर
अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरे या मुख्य भूमिकेत होता तर सैफ अली खानने उदयभान सिंह राठोड या नकारात्मक भूमिकेत होता. शरदने साकारलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. (Top Stories)

अमोल कोल्हे
अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेकदा साकारली आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत त्यांनी साकारलेली महाराजांची भूमिका तुफान गाजली. त्यांनी ‘राजमाता जिजाऊ’ या मालिकेतही महाराजांची भूमिका केली होती. सोबतच हिंदी वेबसीरिज ‘वीर शिवाजी’ मध्येही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आहे. (Entertainment Masala)

चंद्रकांत मांढरे
भालजी पेंढारकर दिग्दर्शित १९५२ मध्ये आलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटात चंद्रकांत मांढरे (Chandrakant Pandhre) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चंद्रकांत मांढरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे खूपच कौतुक झाले.

शंतनू मोघे
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या तुफान गाजलेल्या मराठी मालिकेमध्ये अभिनेता शंतनू मोघेने (Shantanu Moghe) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम वठवली होती. प्रभावी अभिनय पाहू प्रेक्षक अक्षरशः त्याला महाराजच समजू लागले होते.

महेश मांजरेकर
प्रतिभावान अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी २००९ साली ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका देखील खूपच लोकप्रिय झाली.

नसिरुद्दीन शाह
श्याम बेनेगल यांच्या ‘भारत की खोज’ या प्रसिद्ध मालिकेत नसिरुद्दीन शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेत इरफान खान आणि ओम पूरी देखील मुख्य भूमिकेत होते.

चिन्मय मांडलेकर
अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने देखील ‘शेर शिवराय’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’, ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांकडून चिन्मयच्या या भूमिकेचे खूपच कौतुक करण्यात आले होते.

गश्मीर महाजनी
अभिनेता गश्मीर महाजनीने ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रभावी भूमिका साकारली होती.
