Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या दमदार आणि संस्मरणीय चित्रपटांसाठी ओळखले जातात. लवकरच ते ‘गव्हर्नर’ (Governor) हा नवा राजकीय चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी घेतली आहे. उत्कंठावर्धक या राजकीय चित्रपटात आता प्रमुख भूमिकेसाठी मनोज बाजपेयी यांनी एन्ट्री झाली आहे. (Marathi movies)

‘गव्हर्नर’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ऑगस्टमध्ये मुंबईसह आणखी दोन शहरांमध्ये ४० दिवसांचं शूटिंग पूर्ण करणार आहेत. ‘गव्हर्नर’ चित्रपटाची मूळ संकल्पना विपुल अमृतलाल शाह यांची असून, त्यांनी सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत आणि रवी असरानी यांच्यासोबत मिळून या चित्रपटाच्या पटकथेवर काम केलं होतं. दरम्यान, विपुल शाह आणि चिन्मय मांडलेकरसोबत पहिल्यांदाच मनोज बाजपेयी काम करताना दिसणार आहेत. (Manoj Bajpayee movies)
===============================
हे देखील वाचा: Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’; २० वर्षांनंतर मुकेश खन्ना करणार दमदार पुनरागमन !
===============================
Governer या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत असून, निर्मिती विपुल अमृतलाल शाह आणि सहनिर्माते आशीन ए. शाह यांच्या ‘सनशाईन पिक्चर्स’ बॅनरखाली होणार आहे. ‘गव्हर्नर’ हा चित्रपट एका माजी राज्यपालांच्या जीवनावर आधारित आहे. या राज्यपालांचं निधन काही वर्षांपूर्वीझालं असून, त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन ही कथा मांडली जाणार आहे.