Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!

 चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!
बात पुरानी बडी सुहानी

चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!

by धनंजय कुलकर्णी 10/02/2023

राज कपूर यांचे चिरंजीव ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते मिळाला होता. आर के चा हा चित्रपट त्या काळात फारसा चालला नाही. यानंतरचा ‘कल आज और कल’ हा चित्रपट भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात प्रदर्शित झाल्यामुळे देशभर योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोचू  शकला नाही आणि त्याला देखील माफकच यश मिळाले. १९७२ साली  पृथ्वीराज कपूर यांचे निधन झाले. राज कपूर वर एका मागून एक संकटाचे धक्के बसत होते. या काळात त्यांनी ‘बॉबी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. या चित्रपटाच्या दरम्यानचा हा किस्सा आहे. आपल्याकडील फिल्मी मॅगझिनमुळे बऱ्याचदा रिलेशन्स बनतात आणि तुटतातही. असाच काहीसा प्रकार या चित्रपटाच्या दरम्यान झाला होता. एका फिल्म मॅगझिनने ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यातील अफेअरची मसालेदार स्टोरी छापल्यामुळे; ऋषी कपूरच्या रियल लाईफ मधील गर्लफ्रेंड सोबतचे त्याचे ब्रेक-अप झाले होते!  ही अनटोल्ड स्टोरी स्वतः ऋषी कपूर ने त्याच्या आत्मचरित्रात ‘खुल्लम खुल्ला’ मध्ये सांगितली आहे. 

मेरा नाम जोकरच्या वेळेला ऋषी कपूर (Rishi Kapoor) भरपूर जाड होता लठ्ठ होता. ‘बॉबी’ चित्रपटासाठी त्याला वजन कमी करणे गरजेचे होते. म्हणून त्याने स्लिम होण्यासाठी एक ‘जुस्सावाला’ नामक जिम जॉईन केले. या जिम मध्ये बरेच सेलिब्रिटी येत होते. संजीव कुमार देखील याच जिम मध्ये  येत असे. तिथेच ऋषी कपूरची (Rishi Kapoor) भेट यास्मिन नावाच्या एका पारशी मुलीशी झाली. ही मुलगी खूप सुंदर होती. पाहता क्षणी ऋषी कपूर तिच्या प्रेमात पडला होता. यास्मिन ने ऋषीला (Rishi Kapoor) बारीक होण्यासाठी भरपूर टिप्स दिल्या होत्या. त्याच्या डाएट मध्ये चेंजेस करायला सांगितले होते. त्याचा पंजाबी खाना, चिकन/ मटन कमी करून त्याऐवजी सॅलेड खायला सांगितले. याचा खूप चांगला परिणाम दिसत होता. ऋषी कपूर आता बऱ्यापैकी स्लिम झाला होता. या काळात तो यास्मिनला डेट करत होता. दोघे आता मुंबईच्या बऱ्याच हॉटेलमध्ये, बीचवर दिसत होते. ऋषी कपूर(Rishi Kapoor) तिच्याबाबत बऱ्यापैकी सिरीयस होता. याच काळात डिंपल सोबत ऋषीचे अफेअर आहे अशा बातम्या फिल्मी मॅगझिन मधून येऊ लागल्या. सुरुवातीला यास्मिनने याकडे दुर्लक्ष केले. परंतु स्टार डस्टने ऋषी  डिंपलची अफेअरची एक खमंग मसालेदार स्टोरी छापली. त्यामुळे यास्मिन भयंकर चिडली. यास्मिन सिनेमा च्या क्षेत्रापासून लांब होती त्यामुळे तिला हे सर्व खरच वाटत होतं. फिल्मी मॅगझीन अशा प्रकारच्या स्टोरी करत असतात हे तिला सांगून देखील पडले नाही. तिने ऋषी सोबत ब्रेक अप केले. 

बॉबी चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण पुण्यात झाले होते. त्यावेळी यास्मिन ला फोन करण्यासाठी ऋषी कपूर (Rishi Kapoor) स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लाइटनिंग कॉल लावत असे. आणि यास्मिन सोबत  बोलत असे. परंतु ती स्टार डस्ट ची स्टोरी वाचल्यानंतर यास्मिन ने ऋषी कपूर (Rishi Kapoor) सोबत संबंध तोडले. ‘बॉबी’ सिनेमा हिट झाला. नंतर ‘जहरीला इन्सान’ या चित्रपटाचे शूट साठी  ऋषी कपूर(Rishi Kapoor) चित्रकूट कर्नाटकला गेला. तिथे गेल्यावर सुद्धा तो यास्मिनला विसरला नाही. तिथून सुद्धा तो नीतू सिंगला घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये जायचा. नीतू स्वत: यास्मिनला कॉल करून ऋषी कपूरशी बोलायला सांगायची! एकदा रात्री साडेदहा वाजता त्याने यास्मिनच्या मुंबईच्या घरी कॉल लावला त्यावेळी तिच्या आईने स्पष्ट सांगितले ,” तुमच्या संबंधाचे पुढे आता काही होऊ शकत नाही तेव्हा तू यास्मिनला विसरलेला बरा!” 

======

हे देखील वाचा : जावेद अख्तर यांची लव्हस्टोरी पूर्ण करण्यासाठी सलीमचा हात

======

हे ऐकून ऋषी कपूरला (Rishi Kapoor) प्रचंड दुःख झाले आणि तो दारू प्यायला लागला शूटिंग संपल्यानंतर मुंबई आल्यानंतर मित्रांसोबत तो ताज हॉटेलमध्ये गेला योगायोगाने तिथेच यास्मिन तिच्या नव्या बॉयफ्रेंड सोबत आली होती. तिथे ऋषीने मोठा राडा  केला पण नंतर त्याच्या लक्षात आलं यास्मिन आता आपली राहिलेली नाही. तेव्हा हळूहळू तो देखील तिच्यापासून दूर होत गेला. ‘बॉबी’ या चित्रपटाने ऋषी कपूर (Rishi Kapoor) स्टार बनवले पण याच चित्रपटाने त्याचे पहिले  क्रश असलेली गर्लफ्रेंड यास्मिन मात्र त्याच्या पासून कायमची दुरावली. हा संपूर्ण किस्सा ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रामध्ये सांगितला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment information Rishi Kapoor untold story
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.