ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेने केला ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार!
बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ मिळाली. आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे. वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली होती, पण आता हॉस्पिटलमध्येच रुग्णांची सेवा करून बयो आपले शिक्षणही घेते आहे. मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली.(Chotya Bayochi Mothi Swapna)
सोबतच वडिलांचा शोध आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी बयोही आपण पहिली. ही भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे. मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला. या वेळी मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते. इराची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा गायकवाड ही उपस्थित होती. त्याशिवाय ६०० भागांचं निमित्त म्हणून लहानपणीच्या बयो आणि इरा यांनीही उपस्थिती लावली आणि एकत्र साजरा केला ६००वा भाग. या वेळी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली की, ”हा ६०० भागांचा टप्पा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय पूर्ण करू शकलो नसतो.”
”प्रेक्षकांचे प्रेम जर असेच पाठीशी राहिले तर आम्ही अजून जोमाने काम करू. मालिकेच्या संपूर्ण चमूने एकत्र येऊन हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा केला आणि आनंद व्यक्त केला.” आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल.(Chotya Bayochi Mothi Swapna)
=================================
=================================
इरा आणि बयो यांच्यामधील वाद पुढे आता काय वळण घेईल हेही आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी , ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं‘ ही मालिका सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर तुम्हाला पाहता येईल.