Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली?

CID : २७ वर्ष अनकट मनोरंजन ते ए.सी.पी प्रद्युम्न यांची एक्झिट आणि बरंच काही!
प्रेक्षकांना कायमच हटके काहीतरी बघण्यात इंटरेस्ट असतो.. त्यातच क्राईम किंवा थ्रिलर मालिका (Crime Shows) अथवा चित्रपट असतील तर प्रेक्षक आवडीने तो कंटेन्ट पाहतात… एखादी मालिका आपली लोकप्रियता किती वर्ष जपून ठेवू शकते असं विचारलं तर उत्तर असेल २-३ वर्ष. पण CID या मालिकेने तब्बल २८ वर्ष आपली लोकप्रियता जपत प्रेक्षकांची उत्सुकताही कायम टिकवून ठेवली आहे. पण आता सीआयडीमधून (CID) ए.सी.पी प्रद्यम्न (ACP Pradyuman)) यांची एक्झिट होणार असं सांगितलं जात असताना स्वत:च अभिनेते शिवाजी साटम यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.
१९९७ मध्ये सोनी वाहिनीवर CID ही मालिका सुरु झाली. यापूर्वी गुन्हेगारी विश्वावर आधारित बऱ्याच मालिका आल्या होत्या. पण बी. पी. सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या CID मालिकेला लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यााच प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. आणि गेल्या २५ वर्षांपासून CID आजवरचा सर्वात लोकप्रिय आणि गाजलेला क्राईम शो आहे. (Crime shows on television)

CID मालिकेचं दुसरं पर्व सध्या सुरु असून गेल्या काही दिवसांपासून ए.सी.पी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार असून त्यांच्या जागी नवा ए.सी.पी येणार असं सांगितलं जात आहे. मात्र, या सगळ्यावर आता स्वत:च अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना, एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम म्हणाले, “मला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मालिकेतून मी काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. शोमध्ये पुढे काय होणार आहे हे फक्त निर्मात्यांना माहिती आहे. मी माझ्या संदर्भातील सर्व गोष्टी योग्यरित्या स्वीकारण्यास शिकलो आहे. जरी माझी भूमिका इथेच संपली, तरी मी सगळं काही मान्य करेन. मात्र, माझी भूमिका संपतेय की नाही हे मला सांगण्यात आलेलं नाही. सध्या मी शोचं शूटिंग करत नाहीये.”(Entertainment trending news)

पुढे ते म्हणाले की, “मी आता मे महिन्यात सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहे कारण माझा मुलगा, जो परदेशात राहतो, तो भारतात येत आहे. मला गेली २२ वर्षे एसीपी प्रद्युम्न ही भूमिका करायला मिळाली याचा खूप आनंद आहे. हा एक उत्तम प्रवास होता. शोने मला खूप काही दिलं आहे. सध्या मी ब्रेक घेत आहे आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेणार आहे. मी एवढी वर्षे कठोर परिश्रम केलेत आणि प्रत्येकाला ब्रेक मिळायला हवा. आता माझा ट्रॅक पुन्हा सुरू होईल की नाही हे निर्मात्यांनाच माहित आहे.” त्यामुळे आता ए.सी.पी खरंच मालिकेत नसणार का? आणि कोणता नवा ट्रॅक येणार? शिवाय नवा ए.सी.पी आल्यास प्रेक्षकांची त्यावर काय प्रतिक्रिया असेल हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे.(Entertianment tadaka)
================================
================================
मीडिया रिपोर्टनुसार, ‘सीआयडी २’मध्ये शिवाजी साटम यांची जागा अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan ) घेणार आहे. सध्या याबद्दल पार्थ समथानची शोच्या निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे असं देखील सांगितलं जात आहे की, पार्थ समथान एसीपी प्रद्युमनची जागा न घेता शोमध्ये एक नवीन पात्र म्हणून एन्ट्री घेणार आहे. ज्याचे नाव एसीपी अंशुमन असे असणार आहे.(Sony Television)
सी.आय.डी म्हणजे Nostalagia
९० च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येकासाठी CID ही मालिका नॉस्टेलॅजिया आहे… एक काळ असा होता जेव्हा दिवसभर सोनी वाहिनीवर CID मालिकेचे एपिसोड्स सुरु असायचे… आणि अगदी घरात लहान मुलांपासून ते पालकांपर्यंत सगळेच टक लावून ही मालिका पाहात.. सर्वसामान्यपणे लहान मुलांनी क्राईम शो फारसे पाहू नयेत असं प्रत्येक पालकांचं म्हणणं असतं. पण CID च्या बाबतीत असं कधीच झालं नाही. मालिकेतील प्रत्येक ऑफिसर प्रेक्षकांना त्यांच्या जवळचा वाटत होता…(Thriller and crime shows)

दया आणि अभिजीत (Daya And Abhijeet) यांची मैत्री असो किंवा फ्रॅडीचे विनोद, घाबरटपणा असो.. किंवा मग अभिजित आणि डॉ तारिकाचं प्रेमप्रकरण असो.. सी.आय.डी ऑफिसर ही इमेज जपत प्रत्येकाने आपल्यातील नातेसंबंध देखील फार छान हाताळलेले आपण पाहिले.. इतकंच नाही तर १५ ऑगस्टच्या एका एप्रिसोडमध्ये स्फोटात दया मरण पावला असं दाखवलं होतं आणि त्यावेळी जगभरातील सीआयडीचे चाहते अक्षरश: ढसाढसा रडले होते.. असे बरेच भावनिक क्षण गुन्हेगारीवर आधारित असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना २५ वर्षांपेक्षा अधिक काळ दिले.. त्यामुळे प्रेक्षकांचं या मालिकेशी आणि प्रत्येक पात्रांशी खरं तर आपुलकीचं आणि भावनिक नातं तयार झालं आहे…(Entertainment)