Kangana Ranaut ला काना खाली मारणारी सीआयएसएफ जवान निलंबित
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार बनलेली कंगना रणौत सध्या खुप खुश असुन ती पहिल्यांदाच संसदेत जाणार आहे. अशातच काल पार्टीच्या आवाहनानुसार कंगना आपल्या पार्टीला भेटण्यासाठी आपल्या घरुन म्हणजेच मंडीहून दिल्लीला जात होती, पण या दरम्यान तिच्यासोबत असं काही घडलं जे कंगना आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि तिचा पहिला प्रवास अशा प्रकारे सुरू होईल याची तिला स्वतःलाही कल्पना केली नसेल. तर झाल असं की मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचताच तिथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने काना खाली मारली आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तर अभिनेत्रीने यावर एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, जाणून घेऊया या प्रकरणात आतापर्यंत नेमक काय घडलं आहे.(CISF Women Who Slapped Kangana Is Suspended)
बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीच्या भाजप खासदार कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला जवानाने काना खाली मारली. मात्र, यावेळी विमानतळावर भलताच गोंधळ ही उडाला. दरम्यान, आता कारवाई करत सीआयएसएफच्या एका महिला जवानाला निलंबित करण्यात आले आहे. सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांनी कबूल केले की, कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केले होते, ज्यात तिची आईही बसली होती, म्हणून तिने कंगना राणावतला काना खाली मारली होती.
कंगनाला आधी असे वाटले की ती सीआयएसएफ जवान गणवेशात आहे आणि तिला भेटण्यासाठी ती पुढे येतेय मात्र त्याच दरम्यान, कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारली. कंगनाला काही समजेल तोपर्यंत तिच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी महिला सैनिकाला पकडले. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि महिला कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या महिला सैनिकाने कंगनाला कानाखाली मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.(CISF Women Who Slapped Kangana Is Suspended)
============================
============================
कंगना रणौतनेही यासंदर्भात तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर स्टेटमेंट शेअर करत म्हटले आहे की, “माझे हितचिंतक आणि प्रसारमाध्यमधून मला खूप फोन येत आहेत. चंदीगड विमानतळावर आज घडलेली ही घटना सुरक्षा तपासणीसह घडली. तिथली सुरक्षा तपासून मी बाहेर आले तेव्हा दुसऱ्या खोलीत सीआयएसएफचे सुरक्षा रक्षक होते. मी त्यांना पार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समोरून येऊन माझ्या चेहऱ्यावर मारले. यानंतर तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असे का केले असे विचारले असता तिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमध्ये हा दहशतवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे.’ असं ही कंगना म्हणाली.