
कॉमेडियन केतन सिंगने करण जोहरची नक्कल केल्या प्रकरणी मागितली माफी…
चित्रपट निर्माते करण जोहरने रविवारी रात्री इन्स्टाग्राम पोस्ट करत एका टीव्ही शोच्या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली. करणने लिहिले की, त्याने एका कॉमेडियनला अश्लिल पद्धतीने त्याची नक्कल करताना पाहिले. जरी त्याने कोणत्याही शो, कॉमेडियन किंवा चॅनेलचे नाव घेतले नाही मात्र करण, केतन सिंग स्टारर ‘मॅडनेस मचाएंगे‘ या चित्रपटाच्या प्रोमोबद्दल ते बोलत असल्याचं लोकांना समजलं. करणने केलेल्या टीकेला आता कॉमेडियनने उत्तर दिले आहे.(Karan Johar Roast Video)

करण जोहरच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू कधीच नव्हता, असे केतन सिंगने एका मुलाखतीत सांगितले.तो म्हणाला ‘मी करण जोहर सरांची माफी मागू इच्छितो. मी करण जोहरचा फॅन आहे आणि त्यांचे सर्व शो पाहतो. मी त्यांचा रॉकी और राणी की प्रेम कहानी हा चित्रपट ५ ते ६ वेळा पाहिला आहे. मी त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या शोचा खूप मोठा चाहता आहे, माझा हेतू त्यांना दुखावण्याचा नव्हता, मला फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे होते पण जर मी त्यांना दुखावले असेल तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो.

केतन अस ही म्हणाला की, करणने कदाचित संपूर्ण एपिसोड पाहिला नाही तर फक्त प्रोमो पाहिला. हा एपिसोड पाहिल्यानंतर लोकांची आणि करण सरांची प्रतिक्रिया मला पाहायची आहे. मला सरांचा अपमान करायचा नाही. बरेच कलाकार करण सरांची नक्कल करत नाहीत. मी काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हे केल होतं . मॅडनेस माचेंगेवर मी हे पहिल्यांदाच केलं. सध्या तरी माफी शिवाय मी इतर कशाचाही विचार करत नाही आहे.(Karan Johar Roast Video)
=================================
=================================
करण जोहरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी माझ्या आईसोबत टीव्ही पाहत बसलो होतो. आणि मी एका नामांकित चॅनेलवर एका रिअॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला… एक कॉमिक माझी खूप वाईट पद्धतीने नक्कल करत होता… ट्रोलर्स आणि नाव नसलेल्या लोकांकडून मला हीच अपेक्षा आहे, पण जेव्हा तुमचा स्वतःचा उद्योग २५ वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तीचा अनादर करू शकतो, तेव्हा आपण ज्या काळात जगत आहोत त्याबद्दल बरेच काही सांगते… त्यामुळे मला राग येत नाही तर ते मला अस्वस्थ करते!”