दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘April May 99’च्या पोस्टरचे अनावरण

Munawar Faruqui : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल
कॉमेडियन आणि हिंदी बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी त्याच्या वैयक्तिक जीवनासह अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतो. सध्या पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय ठरला असून मुन्नवरने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊ… (Munawar Faruqui)
सध्या कंटेन्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठलाही विषय घेऊन त्यावर पॉडकास्ट करणं किंवा स्टॅन्डअप कॉमेडी शो करण्याचा सपाटा सुरुच आहे. नुकताच समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांना इंडियाज गॉट लेटंट या कार्यक्रमावरुन जोरदार धक्का बसला होता. आणि त्या पाठोपाठ कॉमेडियन मुन्नवर फारुकी यालाही दणका बसला असून जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या ‘हफ्ता वसुली’ या शोदरम्यान त्याने आपल्या बोलण्यातून हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करत त्याच्याविरोधात अमिता सचदेव यांनी तक्रार दाखल केली आहे.(Bollywood News)
अमिता यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे की, “आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम १९६, २९९ आणि ३५३ अंतर्गत अश्लीलता पसरवणे, अनेक धर्मांची खिल्ली उडवणे, सांस्कृतिक मूल्यांची खिल्ली उडवणे आणि लोकांची दिशाभूल करणे यासाठी आयटी कलमांव्यतिरिक्त तक्रार दाखल केली आहे”. तसेच, त्यांनी लिहिले आहे की, “जर मुनावरवर कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन न्यायाची मागणी करणार आहे.” (Munawar Faruqui)
================================
हे देखील वाचा: अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’; Lavani King Ashish Patil चा नृत्याविष्कार
================================
मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) याने यापुर्वीदेखील हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच, कोकणी बांधवांविरोधात त्याने केलेलं विधानही त्याला भोवले होते. अगदी राजकारणातही त्याचा इतका भडका उडाला होता की मुन्नवरने व्हिडिओ करत माफी मागितली होती.
काही दिवसांपूर्वी सलमान खान बिश्नोई गॅंगच्या निशाण्यावर होता. त्याला जीवे मारण्याची धमकी आणि प्रयत्न तर केले गेलेच पण त्याच्या घरच्यांही जीवाला धोका होता. आणि त्याच काळात मुन्नवर दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेला असता त्यालाही जीवे मारण्याची धमकी देत ज्या हॉटेलमध्ये तो राहिला होता तिथले रेकी शुटर्सने केल्याचं सांगितलं गेलं होतं. पण एकूणच सध्याची परिस्थिती पाहता स्टॅण्डअप कॉमेडियन किंवा कलाकार यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकरण वाढत असलं तरी त्यांच्याकडून होणारे संस्कृती किंवा धर्माचे अपमान हे थांबले पाहिजे. कारण, धर्म हा प्रत्येक माणसाचा फार जीव्हाळ्याचा विषय असतो आणि जर का त्याची खिल्ली उडवली गेली तर नक्कीच त्याचा परिणाम हा वाईट होण्याची शक्यता असते यातवाद नाही.(Bollywood update)