Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर! 

 एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर! 
बात पुरानी बडी सुहानी

एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर! 

by धनंजय कुलकर्णी 06/09/2023

हॅट्स ऑफ टू शांताराम बापू!

समाजाचे प्रतिबिंब सिनेमात पडते असे म्हणतात ते खरं देखील आहे; पण कधी कधी सिनेमातील चांगल्या गोष्टी बघून समाजात देखील त्याचे अनुकरण केले जाते. पन्नासच्या दशकात एका हिंदी सिनेमातील एक गाणे ज्या पद्धतीने चित्रित केले ते पाहून तत्कालीन म्हैसूर स्टेट सरकारने त्यांच्या एका गार्डनला जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी सुंदर करून ते जगप्रसिद्ध केले! हा किस्सा मोठा रंजक आहे. (Make Over)

आज कर्नाटक मधील वृंदावन गार्डन हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पण त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी एका हिंदी गाण्याचे कॉन्ट्रीब्युशन फार मोठे आहे. १९२८ साली  मैसूर स्टेट मधील कावेरी नदीवर बांधले गेलेल्या कृष्णाराजा सागर डॅमच्या बॅक वॉटर वर वृंदावन गार्डन बनवण्याचे ठरवले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेसराय्या यांचे या डॅम आणि गार्डनमध्ये मोठे योगदान होते. सलग चार वर्ष हे काम चालले आणि १९३२ पासून हे गार्डन पर्यटकांसाठी खुले झाले. हे वृंदावन गार्डन आणखी सुंदर होण्यासाठी एक घटना घडली ज्यामुळे या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर झाला आणि याला कारणीभूत ठरले एका हिंदी सिनेमातील गाणे! काय होता हा किस्सा? (Make Over)

पन्नासच्या दशकामध्ये चित्रपती व्ही शांताराम आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाची तयारी करत होते. संपूर्णपणे नृत्य संगीतावर आधारित हा चित्रपट टेक्नीकलर होता. शांताराम बापूंनी यावर भरपूर खर्च केला होता. संध्या आणि गोपीकृष्ण हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये होते. अभिजात पारंपारिक नृत्यकला आणि लोकप्रिय नृत्यकला यातील संघर्ष पूर्वी पासून चालू असतो. परंपरा रूढी प्रिय सनातनी समाजाला सुधारणांचे वावडे असते यातून जो संघर्ष होतो त्याचे चांगले प्रतिबिंब या सिनेमात दाखवले गेले होते. अर्थात सिनेमाच्या या आशयाशी आपल्या किस्सा सोबत काही संबंध नाही. (Make Over)

या चित्रपटातील एक गाणे बापूंना वृंदावन गार्डनमध्ये चित्रित करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे कॅमेरामन जी बालाकृष्ण यांना म्हैसूरला पाठवले. शांताराम बापूंना या गार्डन मधील पाण्याच्या कारंजाचे मोठे आकर्षण होते. त्यावेळी हे कारंजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवेत झेप घेत असत. प्रत्येक कारंजाचा फवाऱ्याचा वेग आणि वेळ हा वेगवेगळा होता. शांताराम बापूंनी आपल्या कॅमेरामन प्रत्येक कारंजाच्या वेग आणि वेळेबद्दल माहिती घ्यायला सांगितली.(Make Over)

सर्व माहिती हाताशी आल्यानंतर शांताराम बापूंचे सगळे युनिट म्हैसूरला वृंदावन गार्डनमध्ये पोहोचले आणि सलग आठ दिवस त्यांनी ‘नैन सो नैन नाही मिलाओ…’ या गाण्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी वृंदावन गार्डनला आजच्यासारखी गर्दी नसायची. त्यामुळे शांताराम बापूंना मनासारखे चित्रीकरण करता आले. निगेटिव्ह प्रोसेसिंग होऊन ज्यावेळेला समोर आल्या त्यावेळेला त्यातील दृश्य पाहून सगळेजण खूप भारावून गेले. कारण अतिशय सुंदर असे याचे चित्रीकरण झालं होतं. सर्वांना हे चित्रीकरण खूपच आवडले.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या या सिनेमावर आणि या गाण्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि या गाण्यावर प्रेक्षक जाम फिदा झाले. कर्नाटकात तर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या सिनेमाला वसंत देसाई यांचे संगीत होते. यातील हरेक गाणे लोकप्रिय ठरले. बापूंचा हा अतिशय लाडका सिनेमा होता. मुंबईच्या दादर स्थित व्ही शांताराम यांच्या मालकीच्या ‘प्लाझा’ या अलिशान चित्रपट गृहात हा सिनेमा पुढे अनेक वर्षे रिपीट रनला प्रदर्शित होत असे. ऐंशीच्या दशकात बापूंनी तंत्राच्या सहाय्याने (साऊंड क्वालिटी) या सिनेमाला पुन्हा न्यू लूक देत सिनेमा रिलीज केला, पुन्हा एकदा या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक यश मिळविले. (Make Over)

=========

हे देखील वाचा : हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!

==========

या यशाची वार्ता प्रशासनाच्या वतीने म्हैसूर स्टेट सरकारकडे गेली आणि त्यांनी याच लोकप्रियतेला कॅश करायचे ठरवले. जपान मधील एका कंपनीतील तंत्रज्ञांना बोलवून या कारंजांना म्युझिकल बनवले. आता म्युझिकच्या तालावर आणि कारंजे थुई थुई नाचू लागले. संगीत आणि तंत्रज्ञान या दोघांचं समन्वयातून नयनरम्य असे दृश्य वृंदावन गार्डनमध्ये पाहायला मिळू लागले. आता भारतासोबतच जगभरातील पर्यटक देखील या वृंदावन गार्डनला आवर्जून भेट देऊ लागले. या गार्डनची लोकप्रियता वाढवायला शांताराम बापूंच्या ‘त्या’ गाण्याचा मोठा हात होता हे निश्चित!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.