Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आधी कोर्टात खेचण्याची भाषा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा? Shashank Ketkar च्या पोस्टमुळे चाहतेही गोंधळले…

 आधी कोर्टात खेचण्याची भाषा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा? Shashank Ketkar च्या पोस्टमुळे चाहतेही गोंधळले…
Shashank Ketkar On Mandar Devsthali
टीव्ही वाले मिक्स मसाला

आधी कोर्टात खेचण्याची भाषा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा? Shashank Ketkar च्या पोस्टमुळे चाहतेही गोंधळले…

by Team KalakrutiMedia 09/02/2026

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या स्पष्ट आणि निर्भीड मतांसाठीही ओळखला जातो. जे योग्य वाटत नाही, अन्यायकारक भासते किंवा मनाला खटकते, ते तो कोणताही आडपडदा न ठेवता उघडपणे मांडतो. वैयक्तिक अनुभव असोत वा इंडस्ट्रीतील प्रश्न, शशांक नेहमीच ठाम भूमिका घेताना दिसतो.काही महिन्यांपूर्वी शशांक केतकरने प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devsthali)यांच्याविरोधात गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवली होती. एका मालिकेच्या मानधनाचे पैसे वेळेत न मिळाल्याने त्याने सोशल मीडियावर थेट चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्या संवादामध्ये मंदार देवस्थळी यांनी “लवकरच पैसे देईन” असे आश्वासन दिल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र वारंवार दिलेल्या तारखा उलटूनही पैसे न मिळाल्याने शशांकने कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणानंतर अनेक कलाकारांनीही इंडस्ट्रीतील अशाच अनुभवांवर उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली होती.(Shashank Ketkar)

Shashank Ketkar
Shashank Ketkar Post on Mandar Devsthali

हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नसतानाच, शशांक केतकरच्या एका अलीकडील सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नुकताच मंदार देवस्थळी यांचा वाढदिवस साजरा झाला आणि ज्यांच्यावर काही काळापूर्वी शशांक गंभीर आरोप करत होता, त्याच व्यक्तीसाठी त्याने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या शुभेच्छांची पद्धतही तितकीच लक्षवेधी ठरली आहे.

Shashank Ketkar On Mandar Devsthali

शशांकने मंदार देवस्थळी यांच्यावरील काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला एक जुना वृत्तपत्रातील लेख शेअर केला आहे. त्या लेखात दिग्दर्शकाचा उल्लेख ‘डार्लिंग दिग्दर्शक’ असा करण्यात आला होता. हा लेख शेअर करत शशांकने लिहिले, “तुझ्याबद्दलचा एक जुना आर्टिकल! जग काहीही म्हणो… माझ्यासाठी तू तेव्हाही एक उत्तम दिग्दर्शक होतास आणि आजही आहेस.”शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्या मोठ्या मनाचे आणि प्रोफेशनल दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, तर काहींनी मात्र या पोस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मानधनाचा प्रश्न अजून सुटलेला नसताना वाढदिवसाच्या शुभेच्छा का?’ असा सवाल अनेक जण करताना दिसत आहेत.(Shashank Ketkar)

===========================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतची एन्ट्री…

===========================

उल्लेखनीय बाब म्हणजे, शशांक केतकर आणि मंदार देवस्थळी यांची जोडी पूर्वी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘होणार सुन मी या घरची’ मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केली होती आणि याच मालिकेमुळे शशांक केतकर घराघरात पोहोचला. त्यानंतर दोघांनी कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतही एकत्र काम केले. मात्र याच प्रोजेक्टच्या मानधनावरून वाद निर्माण झाल्याचे शशांकने उघडपणे सांगितले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity Social Media News Entertainment mandar devsthali marathi actor news Marathi TV Industry Controversy Shashank Ketkar Shashank Ketkar Birthday Post Shashank Ketkar Controversy
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.