Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Samay Raina च्या India’s Got Latent शोवर साइबर पोलिसांची मोठी कारवाई; सर्व एपिसोड होणार डिलीट

 Samay Raina च्या India’s Got Latent शोवर साइबर पोलिसांची मोठी कारवाई; सर्व एपिसोड होणार डिलीट
India’s Got Latent
मिक्स मसाला

Samay Raina च्या India’s Got Latent शोवर साइबर पोलिसांची मोठी कारवाई; सर्व एपिसोड होणार डिलीट

by Team KalakrutiMedia 13/02/2025

India’s Got Latent: यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया आणि समय रैना यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहियेत. नुकताच रणवीर अल्लाबादिया ने समय  रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याने आई-वडिलांविषयी एक विनोद केला होता, ज्यामुळे त्याच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पोलिसांनी समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट  या शोचे आतापर्यंत प्रसारित झालेले सर्व १८ भाग काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.(India’s Got Latent)

India’s Got Latent
India’s Got Latent

‘इंडियाज गॉट लेटेंट‘ या शोच्या वादात ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंत सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी युट्युबला पत्र लिहिले आहे. ‘ इंडियाज गॉट लेटेंट ‘चे सर्व १८ आक्षेपार्ह भाग युट्युबवरून तात्काळ हटवावेत आणि चॅनेलवर कारवाई करावी, अशी विनंती पोलिसांनी या पत्रात केली आहे. तसेच युट्युबला ही सर्व सामग्री तपासून डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई करताना दिसत आहेत.

India’s Got Latent
India’s Got Latent

एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्वांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही याबाबत कडक कारवाई केली आहे. एआयसीडब्ल्यूएने इंडियाज गॉट लेटेंटशी संबंधित सर्व व्यक्तींना भारतीय चित्रपट सृष्टीत काम करण्यास बंदी घातली आहे. त्यांच्यासोबत कोणतेही बॉलिवूड किंवा प्रादेशिक चित्रपट निर्मिती संस्था काम करणार नाही.(India’s Got Latent)

=============================

हे देखील वाचा: ‘आता जाण्याची वेळ आली आहे’ मध्यरात्री Amitabh Bachchan यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत…

=============================

एनसीडब्ल्यूने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. एनसीडब्ल्यूने रणवीर अल्लाबाडिया, समय रैना आणि इतरांना त्यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल समन्स बजावले आहे आणि सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Celebrity Entertainment India’s Got Latent Ranveer Allahbadia ranveer allahbadia Show samay raina Samay Raina FIT
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.