
Dada Kondke आणि डॉन हाजी मस्तान यांच्या मैत्रीचे किस्से माहित आहे का?
विनोदाची एक वेगळीच व्याख्या मराठी चित्रपटांमध्ये निर्माण करणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). विनोदीपटांचा एक काळच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आणला होता. हसतमुख असणाऱ्या दादांचे इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्री बाहेर बरेच मित्र होते. पण तुम्हाला माहित आहे का दादा कोंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजेच स्मगलर हाजी मस्तान (Haji Mastan) हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीचा एक खास किस्सा दादांनी त्यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात लिहिला आहे… जाणून घेऊयात हा रंजक किस्सा…(Bollywood news)

तर, दादा कोंडके आणि हाजी मस्तानी यांची ओळख महाराष्ट्राचे त्यावेळेचे मंत्री वसंतदादा यांच्यामुळे झाली होती. अनेक अजरामर चित्रपट देणाऱ्या दादांनी सोंगाड्या हा सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचा उत्तुंगं प्रतिसाद मिळवला होता. याच ‘सोंगाड्या’ चित्रपटाच्या ज्युबिली कार्यक्रमात वसंतदादा हाजी मस्तानला घेऊन आले होते आणि त्या कार्यक्रमाला दादांची हाजी मस्तानशी मैत्री झाली. बऱ्याचवेळा दादांना भेटायला हाजी मस्तान त्यांच्या ताडेदवच्या ऑफिसमध्ये जायचे. त्यावेळी हाजीनेही ‘शकील पिक्वर्स’ नावाने एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. त्या प्रोडक्शन हाऊसचं ऑफिस दादा कोंडकेंच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर होतं. बरं, अंडरवर्ल्डमधल्या हाजी मस्तानपासून दादांनी १० हात लांब राहावं असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला होता. त्यावर दादा त्यांना कायम म्हणायचे की, मैत्रीशिवाय हाजी मस्तानशी माझा काहीही व्यवहार नव्हता, त्यामुळे मला घाबरण्याचं काही एक कारण नाही.(Haji Mastan and dada kondke friendship)
================================
हे देखील वाचा: Alia Bhatt ने कान्सच्या रेड कार्पेटवर दिलेली ‘ती’ फोटो पोज आहे खास!
=================================
एकदा मात्र अनावधानाने दादा कोंडके एका संकटात सापडता सापडता वाचले. झालं असं की दादा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते. तेवढ्यात एक मुलगा दादांना भेटायला आला आणि त्यानं रुममध्ये आल्याबरोबर आपल्या जॅकेटमधून सोन्याची बिस्किटं पटापट काढली आणि दादांसमोर टेबलावर ठेवून दिल. दादांच्या टेबलावर सोन्याच्या बिस्किटांचा अक्षरश: ढीग पडला. हे पाहून दादांना आश्चर्याचा धक्काच बसला.(Entertainment tadaka)
सोन्याची बिस्किटं द्यायला आलेला तो मुलगा दादांना म्हणाला, ‘१५ लाख का माल है, पर आप इसका ८ लाख दे दो,’. त्यावर दादा कोंडके त्याला म्हणाले, मैं नहीं लेता ऐसा माल.’ यावर तो पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता; त्याचा आग्रह सुरुच होता. तो परत म्हणाला की, ‘ले लो साहब, इतने कम पैसे मैं बेच रहा हूँ’. त्याला पैशांची फार गरज होती का काय देव जाणो, पण थोड्या वेळात १५ लाखाचा माल ८ लाखाला मला विकणारा तो मुलगा चक्क १ लाखात सर्व सोन्याची बिस्कीटं द्यायला तयार झाला.(Entertainment)

आता मात्र, दादांना काही सूचत नव्हतं. वेळ घालवण्यासाठी दादा त्या मुलाला म्हणाले, “बाद में सोचेंगे, मेरे पास अभी पैसे नहीं हैं और मैं ये धंदा नहीं करता. त्यावर तो परत म्हणतो कसा, ‘नहीं नहीं, बादमे नहीं, मुझे अभी चाहिए,’ त्याला भलतीच घाई होती. कोण कुठचा माणूस, पोलीस भानगड, चौकशी या भीतीने दादांनी धास्तावले. या सगळ्या प्रकारात तासभर निघून गेला आणि अखेर तो मुलगा ती सोन्याची बिस्किटं घेऊन तिथून निघून गेला. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा
=================================
या घटनेनंतर काही दिवसांनी हाजी मस्तान दादा कोंडकेंना भेटायला आला आणि त्यानं विचारलं की कोणता मुलगा तुमच्याकडे आला होता का? दादांनी त्यावर उत्तर दिलं हो. काही दिवसांनी हाजी मस्ताननं त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी समोर आली. आणि त्यावेळी दादा कोंडकेंना तेव्हा आपण घेतलेला निणर्य योग्य होता याची जाणीव झाली.(Dada kondke)