Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नायिकाच आहेत गायिका!

 नायिकाच आहेत गायिका!
टीव्ही वाले मिक्स मसाला

नायिकाच आहेत गायिका!

by Kalakruti Bureau 24/03/2021

अभिनयाबरोबर अभिनेत्रीचा गाता गळा असेल तर मग उत्तमच. त्या अनुषंगाने मग कथानकात तिला कधी गायिकेचा मान मिळतो तर कधी प्रसंगानुरूप तिला एखादं गाणं गायची संधी मिळते. यामुळे मालिकेतील एखादा प्रसंग प्रभावीपणे मांडता येतोच पण या नायिकांना गायिका म्हणूनही प्रेक्षकांसमोर स्वतः ला प्रेझेंट करता येतं.

‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती अनेकदा आपल्याला मालिकेत गाताना दिसते. मालिकेच्या कथानकात तिला गायिका म्हणून देखील चित्रीत करण्यात आलं आहे. ती स्वतः गाण्याच्या शिकवण्या घेते असं दाखवण्यात आलं आहे. अरूंधती आणि अनिरुद्धच्या पंचवीसाव्या वाढदिवशी अरुंधतीच्या तोंडी तिचं नवऱ्याप्रती असलेलं प्रेम दर्शविण्यासाठी मन शेवंतीचे फूल झाले हे गाणं गातांना दाखवण्यात आलं. तर नवऱ्याचं बाहेरच्या बाईशी असलेलं अफेअर ऐकल्यानंतर ती कोलमडते पण पुन्हा धीराने उभी राहते असं दाखवतांना स्वतः च्या मुलांनी हौसेने साजऱ्या केलेल्या वाढदिवस सोहळ्यात एकाच ह्या जन्मी जणू हे गाणं विश्वासाने गाताना तिला दाखवलंय. एका प्रसंगात आश्रमातील बायकांना उभारी देण्यासाठी आकाशी झेप घे रे पाखरा हे गाणं गातांना अरुंधती दिसली. वरील सर्व गाणी आई कुठे काय करते मालिकेची नायिका आई म्हणजेच ‘मधुराणी प्रभुलकर’  यांनी अतिशय भावपूर्ण गायली आहेत.

Aai Kuthe Kaay Karte
Arundhati – Aai Kuthe Kay Karte

‘माझा होशील ना’ या मालिकेत देखील सई आणि आदित्यची लव्ह स्टोरी रंगवताना प्रसंगाला अनुरूप गाणी सई गाताना दिसतेय. आदित्य आणि सईचं मालिकेत भांडण होतं आणि मग काय सई आदित्यला मनवण्यासाठी अच्छा जी मैं हारी…  हे गाणं गातांना पाहायला मिळालं. त्यानंतर सई आदित्यच अबोल प्रेम चितारतांना लेखकाने एका पावसाळी रात्री सई आदित्य एकत्र असताना सईला मेरी जा मुझे जान कहो मेरी जा…  हे गाण गाताना दाखवलं. प्रत्येक मालिकेचा उत्कंठावर्धक प्रसंग म्हणजे नायक नायिकेचा लग्न सोहळा हा असतो. बाई नसलेल्या घरात सईचं लग्न होतं पण आदित्यचे मामा म्हणजे सईचे सासरेबुवा घरातील एखादी कर्ती बाई ज्याप्रमाणे पुरवेल अशी तिची सगळी हौस पुरवतात. तिची आणि आदित्यची हळद मोठ्या हौसेने करतात तेव्हा मामा गाणं गातात त्याला जोडून सई  हळद लागली हळद लागली सून होण्याची आस जागली हे खास मालिकेसाठी लिहिलेल गाणं गाते अस दाखवलं. माझा होशील ना मालिकेमधील गाणी गौतमी देशपांडे या मालिकेच्या नायिकेने आपल्या सुरेल आवाजात सुंदर गायिली. त्यामुळे मालिकेतील चाफा रातराणी म्हणजेच सई आदित्यच्या प्रेमाचे प्रसंग पाहताना आणखी छान वाटलं.

अशा प्रकारे आता प्ले बॅक किंवा रेकॉर्डेड गाण्याचा वापर न करता नायिका स्वतः गायिका असल्याने त्या मालिकेत प्रत्यक्ष गातांना दिसत आहेत. आणि या नायिका उत्कृष्ट गायिका असल्याने कथानकाच्या प्रसंगांना चार चांद लागत आहेत. गाणी गातांना या नायिका अचूक भाव पकडून तो अभिनयातून रंगवत असल्याने मालिका पाहण्यासाठी रंजक होत आहेत.

– सिध्दी सुभाष कदम 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Channel Entertainment Marathi television Singer Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.