
Dashavatar Film : कोकणातील ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर गाजला…
कोकणातील ‘दशावतार’ (Dashavatar) सध्या सगळीकडे गाजतोय… दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख असणारा दशावतार चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे… बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांसाठी थिएटर्सबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागायला सुरुवात झाली हे सकारात्मक चित्र आहे… तसेच, प्रेक्षकांना मराठीत सस्पेन्स थ्रिलर कथा फार काळानंतर पाहायला दशावतारमुळे मिळाली आहे यातही शंका नाहीच.. १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाई केली आहे… जाणून घेऊयात ५ दिवसांत दशावतारने किती कमावले आहेत…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५८ लाख, दुसऱ्या दिवशी १.३९ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७२ कोटी, चौथ्या दिवशी १.०१ कोटी कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने ५.७ कोटींचा गल्ला जमवला आहे… विशेष म्हणजे याच दिवशी आणखी २ मराठी चित्रपट रिलीज झाले होते आणि त्यांनी देखील उत्तम कमाई केली आहे…(Dashavatar box office collection)
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : “सचिन पिळगांवकर मला सिनीयर आहे…”
=================================
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात कोकणातील ‘दशावतार’ हा पिढ्या दर पिढ्या सुरु असणारा लोककला प्रकार नेमका कसा आहे? आणि त्याभोवती लोकांचं आयुष्य कसं फिरतं आणि त्यातून एक घटना घडते त्याचं आणि दशावताराचं काय कनेक्शन आहे? असा सगळा रंजक प्रवास चित्रपटात पाहायला मिळतो… तसेच, कमाईबद्दल बोलायचं झालं तर या वर्षी रिलीज झालेल्या गुलकंद चित्रपटाचा रेकॉर्ड दशावतारने मोडला आहे… आता पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट २० कोटींचा टप्पा पार करेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे…

दशावतार चित्रपटाची ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, सुनील तावडे, भरत जाधव, महेश मांजरेकर, गुरू ठाकूर, विजय केंकरे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. (Marathi movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi