Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
थिएटर गाजवल्यानंतर Dahshavatar आता ओटीटीवर कल्ला करायला सज्ज!
मराठी मातीतील चित्रपट प्रेक्षकांना कायम भावूक करत आपल्या पाषात ओढून घेतातच… दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘दशावतार’ (Dashavatar Movie) चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकून बॉकिस ऑफिसवरही कल्ला केला आहे… १३ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने एक महिन्यापेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये गाजवला… आणि आता हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे… ‘दशावतार’ कधी आणि कुठे रिलीज होणार आहे जाणून घेऊयात..

थिएटरमध्ये हाऊसफुल्लच्या बोर्ड लावणारा ‘दशावतार’ चित्रपट काही प्रेक्षकांना जर का पाहता आला नसेल आणि ज्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा या चित्रपटाचा अनुभव घ्यायचा असेल तर आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे… ‘दशावतार’ चित्रपट काही दिवसांतचझी५ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. “२०२५ या वर्षातला सुपरहिट भव्य दिव्य सिनेमा ‘दशावतार’ १४ नोव्हेंबर पासून फक्त आपल्या मराठी ZEE5 वर…!”, अशी पोस्ट करत झीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, ‘दशावतार’ चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर २४.१४ कोटींची कमाई केली आहे… केवळ भारतातच नाही तर जगभरातही या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे…. ‘कांतारा’ (Kantara – Chapter 1) फेम ऋषभ शेट्टी यालादेखील भूरळ पाडणारा दशावतार चित्रपट २०२५ मधला सुपरहिट मराठी चित्रपट नक्कीच ठरला आहे यात शंका नाही…
================================
हे देखील वाचा : Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
================================
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत यात सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi