‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Dashavatar मध्ये बाबूल मेस्त्रींनी ‘मत्स्यावतार’ कसा साकारला?
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपट ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा १’ (Kantara 1) चित्रपटालाही टक्कर देत आहे.. विशेष म्हणजे स्वत: ऋषभ शेट्टीने ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे… तसंच, वयाच्या ८०व्या वर्षीही दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार चित्रपटात स्वत: स्टंट केले आहेत… या चित्रपटात प्रभावळकरांनी विविध भूमिका साकारल्या त्यापैकी त्यांचा मत्स्यअवतार प्रेक्षकांना विशेष भावला… आता सोशल मिडियावर या मस्त्यअवराताया मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे… (Dashavatar movie)

दिलीप प्रभावळकर यांनी ‘दशावतार’ तील त्यांच्या मत्स्यावतारातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, ”दशावतारातील ‘मत्स्यावतार’, एक दिव्य! ‘दशावतार’ चित्रपटातला माझा सगळ्यात गाजत असलेला अवतार म्हणजे, ‘मत्स्यावतार’! निळ्या रंगातील चमकदार रंगभूषा आणि वेशभूषा… त्यासाठी सगळ्या टिमने तासंतास घेतलेले कष्ट… कुडकुडत्या थंडीत पाण्याखाली जाऊन केलेले चित्रीकरण आणि त्या साऱ्याचे फलित म्हणजे चित्रपटगृहात प्रेक्षकांनी ‘मत्स्यावताराच्या’ प्रसंगाला दिलेली दाद! अजूनही तुम्ही ‘दशावतार’ पाहिला नसाल तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो नक्की पहा! चुकवू नये असं काहितरी सिनेमागृहात पाचव्या आठवड्यातही सुरु आहे!” (Marathi movie 2025)
================================
हे देखील वाचा : Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
================================
दरम्यान, ‘दशावतार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटींचा टप्पा पार केला आहे…तर, जगभरात ‘दशावतार’ने २६.४३ कोटींची कमाई केली आहे. सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन,भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. (Dashavatar cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi