राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या गाथा !
Dashavtar: चिमणराव असो, श्रीयुत गंगाधर टिपरे असो किंवा तात्या विंचू, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन यावर आपल्या कसदार अभिनयाने अमीट ठसा उमटवणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या अभिनयातील प्रयोगशीलता आणि सातत्य थक्क करणारे आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित आणि गूढ थरारकतेने भरलेला ‘दशावतार‘ या आगामी चित्रपटात ते एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ थरार किंवा रहस्यकथेपुरता मर्यादित नसून, कोकणातील स्थानिक जीवनशैली, तेथील लोककला, पारंपरिक श्रद्धा आणि निसर्गसंपन्नता यांचं देखील सुंदर चित्रण करतो. या कथेला सस्पेन्स, उत्कंठा आणि वैचारिक गुंतवणूक यांची जोड देण्यात आली असून, चित्रपटाचा कॅनव्हास भव्य आणि अनुभव समृद्ध करणारा आहे.(Dashavatar Marathi Movie)

झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाचं लेखन, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे सुबोध खानोलकर यांनी. या भव्य प्रकल्पाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी संयुक्तपणे केली आहे. तर, चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत.

चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची भूमिका त्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा खूपच वेगळी असून, ही भूमिका रसिकांना आश्चर्यचकित करणारी ठरणार आहे. त्यांच्या अभिनयातली बारकावे, त्यांची संयमित संवादफेक आणि उपस्थिती हा चित्रपट अधिक प्रभावी बनवते. त्यांच्यासोबत इतर काही महत्वाचे कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत, ज्यांची माहिती लवकरच उघड केली जाणार आहे.(Dashavatar Marathi Movie)
============================
हे देखील वाचा: Yere Yere Paisa 3 Movie Trailer: ‘५ कोटींचा खेळ कोण जिंकणार? १८ जुलै ला उलघडणार !
============================
‘दशावतार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय १२ सप्टेंबर २०२५ रोजी. या चित्रपटाची पहिली झलक लवकरच झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरच्या प्रतीक्षेत असलेले रसिक त्यातून चित्रपटाची थरारक झलक अनुभवू शकतील. दिलीप प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी हा एक पर्वणीसमान अनुभव ठरणार असून, नव्या स्वरूपात आणि अनोख्या पार्श्वभूमीवर त्यांना पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.