Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लाडाची मी लेक गं…

 लाडाची मी लेक गं…
टीव्ही वाले मिक्स मसाला

लाडाची मी लेक गं…

by Kalakruti Bureau 14/04/2021

मुलीचा नेहमीच आईपेक्षा वडिलांवर जास्त जीव असतो अगदी त्याचप्रमाणे मुली वडिलांच्या लाडक्या असतात हे त्रिवार सत्य आहे आणि याला मालिकेतील मुलगी वडिलांची जोडी अपवाद नाही. मालिका विश्वात देखील लेक आणि बापाचं अगदी घट्ट प्रेमाचं नातं साकारतांना कलाकार दिसत आहेत. मालिकेतील संवाद आणि अनेक प्रसंगामधून या नात्याची जवळीक अधोरेखीत होत आहे. कोणकोणत्या मालिकात आहे ही बाप लेकीची सॉलिड टीम जरा नजर टाकूया.

‘झी मराठी’ वरील ‘माझा होशील ना‘ या मालिकेत शशिकांत उर्फ बब्या बिराजदार कितीही लफडेबाज असला तरीसुद्धा आपल्या लेकीच्या बाबतीत मात्र तो हळवा बाप आहे… तिच्या लग्न सोहळ्याच्या  वेळी त्यांना अटक झालेली असताना देखील आदित्य या बाप लेकीची भेट घडवून आणतो. त्या वेळी आपल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या सुखाने सुखावलेला बाप अतिशय उत्तम प्रकारे लेखकाने कथानकातून रंगवला आहे.

‘स्टार प्रवाह’ वरील ‘आई कुठे काय करते’ मधील इशू तर अनिरुद्धचा जीव की प्राण आहे. अरुंधती पासून वेगळं  होऊन तो संजनासोबत राहत असला तरीसुद्धा त्याला नेहमीच आपल्या लाडक्या लेकीची काळजी लागून राहिलेली असते. आता तर आई बाबा एकत्र राहत नाहीत या रागाने इशा जीव द्यायचा प्रयत्न करते… कारण तिला दोघांच प्रेम हवय.. आता आपल्या लेकीसाठी अनिरुद्ध परत घरी राहायला येणार का? या प्रश्नाच उत्तर मालिकेला रंजक वळणावर घेऊन जाईल.

Maza Hoshil Na Sai With Her Father
Maza Hoshil Na Sai With Her Father

‘झी मराठी’ वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू आणि दादांची जोडी अशीच एक हळवी जोडी म्हणावी लागेल. स्वीटूच्या लठ्ठपणावरून आई तिला बोल लावते तिच खाणंपिणं कमी करते. पण आपल्या लेकीचं हिरमुसलेलं मन दादा म्हणजे स्वीटू चे बाबा ओळखतात आणि तिला घराबाहेर शेजारी घेऊन समजावतात. आधार देतात. तिच्या लग्नाचा निर्णय तिने स्वतः घ्यावा असं ते तिला सांगतात… यातील संवादातून बापाचं हळवं मन, लेकीचं वडिलांवरच प्रेम चित्रित होताना दिसतंय.

‘कलर्स मराठी’ वरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील शर्वरी आणि बाबा तर एकदम भारी आणि वेगळे आहेत.. कारण या बाप लेकी मध्ये मैत्रीचं नातं आहे. शरूला बाबा एकदम बेस्ट फ्रेंड वाटतो. एखाद्या मित्रा सारखी ती बाबाशी मोकळेपणाने वागते. बापाचा धाक वाटण्यापेक्षा तिला तो आपला शेअरिंग, गॉसीप पार्टनर वाटतो. शंतनूच्या बाबतीत शरूच्या आईची मतं विरूद्ध टोकाची असताना हा बेस्ट फ्रेंड बाबा तिच्या बाजूने कसा उभा राहून तिला मदत करेल  हे जाणून घेण्यासाठी मात्र नक्कीच मालिका पाहायला हवी.

अशाप्रकारे मुलीसाठी बाबा हा खरा हिरो असतो आणि मुलगी त्याची लाडाची लेक असते हे रिअल लाईफ चित्र मालिकेतूनही प्रतिबिंबित होतंय आणि आता मालिका विश्वात बाप लेकीची जोडी हिट होतेय यात शंका नाही.

-सिध्दी सुभाष कदम 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment marathi actress Marathi television Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.