Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रिय माधुरी

 प्रिय माधुरी
आठवणींच्या पानावर मिक्स मसाला

प्रिय माधुरी

by Kalakruti Bureau 15/05/2020

प्रिय माधुरी

खरं तर आपल्या वयातलं अंतर, तुझं वलय, तुझं काम हे सगळं जरी पक्कं माहित असलं, तरी ‘ए माधुरी’ म्हणण्याचा अधिकार आहेच तुझ्या चाहत्यांना, म्हणूनच मलाही. तुझी सगळ्यात पहिली पाहिलेली फिल्म म्हणजे ‘हम आप के है कौन’. तुझं मधाळ हसणं, दिलखुलास बागडणं, खट्याळपणा, नाचातली ग्रेस या सगळ्या अदांनी अक्षरशः वेड लावलं आणि एखाद्याचं जबरदस्त फॅन असणं म्हणजे काय ते तेव्हा वयाच्या दहाव्या वर्षी  अनुभवलं. तुझ्या जागी दुस-या कुणाची कल्पना करुच शकत नाही. तेव्हा मी लहान होते, त्यामुळे तू मराठी आहेस ही माहिती आईनेच मला पुरवली, तेव्हा कसलं भारी वाटलं माहितेय. मग तर मी नाच आणि नाटक चांगलंच मनावर घेतलं. आणि शाळा काॅलेज, सोसायटीमध्ये (अगदी आरशासमोरही) नाटकात आणि क्वचित नाचातही भान हरपताना तुलाच डोळ्यासमोर ठेवलं होतं मी. माझ्यातल्या किंचित कलेची पहिली प्रेरणा तूच आहेस माधुरी.

तुझे बाकीचे चित्रपट नंतर पाहिले- दिल, बेटा, राजा, साजन, अंजाम, DTPH… साजन खूप आवडला आणि DTPH ची पारायणं केली. तुझ्या हसण्याइतकेच तुझे हावभाव आवडले, संवादफेक आवडली, नाजूक कशिदा काढावा तसा नाचाला असलेला ‘माधुरी टच’ कमालीचा भावला. तू शिकवलेल्या स्टेप्स करतेस, असं कधीच वाटलं नाही, आतून येतं आणि उत्स्फूर्त नाचतेस असं वाटतं. तुझी नक्कल अनेकींनी केली, पण साक्षात मधुबालाची उपमा देऊनही तू तुझ्या पद्धतीने काम केलंस आणि स्वतःचं स्थान निर्माण केलंस.

मग साहजिकच तू मोठी दिसू लागलीस, लग्न केलंस, चित्रपटांची निवड चुकत गेली, नवीन तारका चमकू लागल्या. थोडं वाईटही वाटायला लागलं. आणि इकडे मलाही थोडी समज आल्याने स्वप्नाळूपणाही कमी झाला आणि तुझ्या प्रेमपटांची पारायणं कमी केली. पण तू  DTPH पर्यंत कमावलेलं वलय जराही कमी झालं नाही, अगदी आजही नाही. काही चित्रपट, जाहिराती, पुरस्कार सोहळा, रिअॅलिटी शो..सगळीकडे तू आजही दिसतेस. तुझा चित्रपट सुपर हिट होण्याची आता खात्री नसते. वेगळा असण्याची शक्यताही नसते. आमीर खान किंवा विद्या बालनसारखी त्या बाबतीत तू हुशार नाहीस. नूतन – स्मिता पाटीलसारखी कसलेली अभिनेत्री नाहीस, हेही लक्षात येतंय आता. बकेट लिस्ट ने तर पार निराशाच झाली. पण तरीही आजही तुझी तेवढीच फॅन आहे. तुझ्यावरच्या प्रेमापोटीच ड्रीमगर्ल्स- मधुबाला ते माधुरी कार्यक्रम सादर केला होता. तुझ्यासाठी  चित्रपटाला गर्दी होईलच अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आजचा ऑडिअन्स जाणकार आहे. तुझ्या या मर्यादा तुलाही माहित आहेत. पण म्हणून तू थांबली नाहीस. तुझा वावर आजही लोभस वाटतो. ग्रेस कायम आहे. हसणं तितकंच मधाळ आहे. माधुर्य सदाबहार आहे याची जाणीव ठेऊन छोटा पडदा, पुरस्कार सोहळे इथे तू भाव खाऊन जातेस. इंटरव्हयू मध्ये तुला ऐकताना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळते. पन्नाशीच्या नंतरही तुझा सळसळता उत्साह मनाला चैतन्य देतो. काम तू थांबवलं नाहीसच. परीक्षक म्हणून, निर्माती म्हणून बिझी असतेस. सगळ्यात आवडलेली तुझी संकल्पना म्हणजे डान्स विथ माधुरी. आज घरबसल्या कितीजण स्वतःची नाचाची हौस तुझ्यामुळे भागवतात. नाचायला शिकायचं तेही डान्सिंग क्वीन माधुरीकडून ही कल्पनाच भन्नाट आहे. आज बाकीच्या हिराॅईनचे नवरे आम्हाला माहित नाहीत. पण माधुरी-श्रीराम जोडी हिट आहे. आणि तुझं आकर्षण जराही कमी नाही झालं त्यामुळे. शेवटी एवढंच म्हणायचंय –

तुझ्याविना आहे

चित्रसृष्टी अधुरी

लाख दिलोंकी धडकन तू

धकधक गर्ल माधुरी

HAPPY BIRTHDAY 

ऋचा इंद्रनील(थत्ते)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Celebrity Birthday Entertainment social media
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.