
Deepika Padukone ठरली मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय
एकीकडे हिंदी आणि साऊथ चित्रपटांतून दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) पत्ता कट होताना दिसतोय… तर दुसरीकडे दीपिका स्वत:ची वेगळी ओळख जागतिक पातळीवर तयार करताना दिसत आहे… आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणारी दीपिका मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममधील व्हर्च्युअल असिस्टंट असून रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश देखील आहे… आता, दीपिका या एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली असून यात हॉलीवूड स्टार अवक्वाफिना आणि जुडी डेंच यांच्या नावांचा देखील समावेश आहे. (Entertainment News)

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडमध्ये दीपिकाचा आवाज ऐकू येणार आहे… सध्या तरी, दीपिकाचा आवाज इंग्रजीत उपलब्ध असणार आहे, परंतु; लवकरच कंपनी हिंदी भाषा आणि यूपीआय लाइट पेमेंटवरही तिचा आवाज सुरु करणार आहे…
================================
हे देखील वाचा : Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
================================
दरम्यान, दीपिका पादूकोण हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्पिरीट’ (Spirit Movie) आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून ती बाहेर पडली आहे… तसंच, ‘द इंटर्न’ (The Intern) या हिंदी चित्रपटातही आता ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून भूमिका साकारणार आहे… शिवाय, शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत ‘जवान’ (Jawan movie) चित्रपटानंतर पुन्हा एकदा ती ‘किंग’ मध्ये दिसणार आहे आणि अल्लू अर्जूनसोबतही लवकरच स्क्रिन शेअर करणार आहे.. (Deepika Padukone Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi