Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

८ तासांच्या शिफ्ट ट्रोलिंगवर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली, “बरीच वर्ष मेल सुपरस्टार्सही….”
अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे… निमित्त तिच्या नव्या चित्रपटाचं नसून कोणत्याही चित्रपटासाठी ८ तासांचीच शिफ्ट हवी या मागणीसाठी… याच तिच्या मागणीमुळे ‘स्पिरिट’ (Spirit) आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असं सांगण्यात आलं… आता या चर्चांवर दीपिकाने मौन सोडलं असून कित्येक पुरष सुपरस्टार्सही बरीच वर्ष केवळ ८ तासांची शिफ्ट करतात असं तिने म्हटलं आहे… जाणून घेऊयात नेमकं दीपिका काय म्हणाली? (Deepika Padukone news)
सीएनबीसी टीव्ही १८ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोण हिने ८ तास काम करण्याच्या मागणीवर आपलं स्पष्ट मत व्यक्त करत म्हटलं की, ”एक महिला कलाकार म्हणून जर या गोष्टी तुम्हाला दबावासारख्या वाटत असतील, तर तसंच तुम्ही समजू शकता… गेली अनेक वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रामुख्याने पुरुष सुपरस्टार ८ तासांची शिफ्ट करताना दिसत आहेत, पण या गोष्टी कधीच चर्चेत आल्या नाहीत.” (Entertainment News)

पुढे दीपिका म्हणाली की, “मी इथे कोणाचंही नाव घेणार नाही. जर मी तसं केलं, तर त्याची हेडलाईन बनेल आणि मला तसं होऊ द्यायचे नाही. लोकांना हे माहित असायला हवे की अनेक पुरुष कलाकार दररोज ८ तास काम करत आले आहेत. आणि त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे त्यापैकी अनेक जण सोमवार ते शुक्रवारपर्यंत फक्त ८ तास काम करतात, ते वीकेंड्सला कामही करत नाहीत”… त्यामुळे आता दीपिकाच्या या वक्तव्यावर इंडस्ट्रीतून लोकांच्या प्रतिक्रिया येणार का? आणि आगामी तिच्या कोणत्या प्रोजेक्टवर त्याचा परिणाम होणार का हे पाहणं महत्वांच असणार आहे…
================================
हे देखील वाचा : Tripti Dimri ने स्पिरिटमध्ये दीपिका रिप्लेस करुनही तिच्या समर्थनाथ केली ‘ही’ पोस्ट!
=================================
दरम्यान, दीपिका पादूकोणच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत ‘जवान’ नंतर पुन्हा एकदा ‘किंग’ (King movie) चित्रपटात ती स्क्रिन शेअर करणार आहे… या चित्रपटात सुहाना खान, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. तसेच, या व्यतिरिक्त दीपिका पादुकोण अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि ॲटली कुमार यांच्यासोबतही एक बिग बजेट चित्रपट करणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi