Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

… म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली…

 … म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली…
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

… म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली…

by सई बने 14/01/2021

धूम चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. धूम चित्रपटांच्या मालिकेतील चौथ्या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरु होणार असून वर्षाअखेरीस हा धूम ४ (Dhoom 4) प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या धूम ४ चे कथानक एका स्मार्ट “चोरनी” भोवती फिरणार आहे. या भूमिकेत दीपिका पदुकोन (Deepika Padukone) असणार आहे.

यशराज बॅनर्सच्या या यशस्वी चित्रपटाच्या मालिकेत पहिल्यांदाच दीपिका आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) एकत्र दिसणार आहेत. या दोघांसोबत जॉन अब्राहमही (John Abraham) महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये ऋतिक आणि दीपिका स्टार म्हणून आपला ठसा उमटवत असतांना दोघांना एकत्र काम करता आले नव्हते. धूम ४ च्या निमित्तानं हे दोघं पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हे देखील वाचा: दीपिका पादुकोन: गुलाबाचा काट्यांसह प्रवास…

ऋतिक आणि दीपिका

धूम चित्रपटाच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतलं आहे. यशराज बॅनर्सचे (Yash Raj Films) हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरले आहेत. जॉन अब्राहम, ऋतिक रोशन आणि अमिर खान यांच्या या ऍक्शनपटांनी तरुण पिढीला आपल्याकडे खेचून घेतलं आहे. आता याच ऍक्शनपटाचा पुढचा भाग काय आणि कसा असणार याची उत्सुकता आहे.

हा चौथा भाग वेगळा असावा यासाठी आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी चोराच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोनचे नाव नक्की करण्यात आले आहे. या भूमिकेसाठी आदित्य चोप्रा यांची पहिली पसंती प्रियंका चोप्राला होती. पण परदेशात असलेल्या प्रियंकाच्या २०२१ मधील सर्व तारखा बुक असल्यामुळे धूम ४ मध्ये दीपिकाची वर्णी लागली. त्यासोबत ऋतिकही पुन्हा एकदा धूमच्या मालिकेत दिसणार आहे.

Dhoom 4

धूम ४ चे दिग्दर्शन मनिष शर्मा करणार आहेत. दीपिका, ऋतिक आणि जॉन अब्राहम या तिघांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. या तिघांमध्ये ऋतिक रोशन या नव्या वर्षात सर्वात बिझी स्टार ठरणार आहे. कारण ऋतिक सध्या त्याच्या होम प्रोडक्शनच्या “क्रिश” चित्रपटाच्या पुढच्या भागाच्या तयारीत आहे.

हे वाचलंत का: कंगना दिसणार पायलट आणि अम्मा च्या रूपात…

याशिवाय महाभारत चित्रपटामध्येही त्याला महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. या व्यतिरिक्त ऋतिकला तामिळ चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्येही लिड रोल मिळाला आहे. आर. माधवन आणि विजय सेतुपती यांची प्रमुख भूमिका असलेला हा तामिळ चित्रपट सुपरहीट ठरला होता. आता त्याच्या हिंदी रिमेकमध्ये ऋतिक रोशन आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity News Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.