Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?
हिंदी चित्रपटसृष्टीत येत्या काळात विविध धाटणीचे चित्रपट येणार आहेत. नव्या विषयांसह जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) एकत्रित ‘कल्की २’ नंतर झळकणार होते. मात्र आता दीपिका स्पिरिट चित्रपटाचा भाग नसणार आहे.(Entertainment trending news)

‘कबीर सिंह’ (Kabir Singh) आणि ‘अॅनिमल’ (Animal) या सारख्या धमाकेदार चित्रपट देणारे संदीप रेड्डी वांगा लवकरच स्पिरिट चित्रपट घेऊन येणार आहेत. मात्र, आता दीपिका पादूकोण हिला ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून दिग्दर्शकाने हटवल्याचे समोर आले आहे. यामुळे चाहत्यांची फार निराशा झाली आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मनात दीपिकाला अचानक का हटवलं असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Bollywod news) दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्या वाढत्या डिमांड्समुळे दिग्दर्शकांनी तिला या प्रोजेक्टमधून हटवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे
================================
=================================
तसेच, मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीपिका पादुकोणने ८ तास कामाचा दिवस मागितला होता. तसेच, दीपिकानं चित्रपटाच्या नफ्यातील एक टक्के रकमेसह मोठं मानधनही मागितलं होतं. इततंच नव्हे तर तेलुगु संवादही बोलण्यास तिने नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी तिला या चित्रपटातून मागे हटवण्यात आलं आहे. आता दीपिकाच्या ऐवजी ‘स्पिरिट’ मध्ये प्रभाससोबत (Prabhas) कोणती अभिनेत्री दिसणार याचा शोध सध्या सुरु आहे.(Bollywood gossips)