
Shah Rukh Khan : किंग खानच्या आईनंतर ‘ही’ अभिनेत्री सुहानाची आई साकारणार!
हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग खान (Shah Rukh Khan) लवकरच त्याची मुलगी सुहाना खान सोबत आगामी चित्रपटात काम करताना दिसणार आहे… नुकताच त्याच्या मुलाचा आर्यन खानचा दिग्दर्शन डेब्यू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो मुलीसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.. आत्तापर्यंत शाहरुख खान याने अनेक अभिनेत्रींसोबत ऑन स्क्रिन रोमॅन्स करताना दिसला.. मग यात अनुष्का शर्मा, दीपिका पादूकोण, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी अशा अनेक अभिनेत्रींची नाव घेता येतील.. मात्र, आता शाहरुख खानच्याही आईचं काम ज्या अभिनेत्रीने केलं होतं ती सुहाना खानची (Suhana Khan) आई म्हणून काम करताना दिसणार आहे..(Bollywood upcoming movies)
शाहरुख खान याची अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री फारच गाजली.. पण त्यातही काजोल आणि शाहरुखनंतर त्याची आणि दीपिका पादूकोणची जोडी विशेष प्रेक्षकांना आवडली… दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटात शाहरुख सोबत काम करत आपल्या अभिनयाची सुरुवात केली.. त्यानंतर जवान, पठान, चेन्नई एक्सप्रेस अशा चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेलं हे कपल आता सिद्धार्थ आनंदच्या आगामी अॅक्शन थ्रिलर ‘किंग’मध्येही हे ऑनस्क्रिन पॉवर कपल पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. (Entertainment gossips)

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका (Deepika Padukone) या चित्रपटात कॅमिओमध्ये दिसणार आहे. यात दीपिका सुहाना खानच्या ऑन-स्क्रीन आईची भूमिका साकारण्यास सज्ज आहे. यापूर्वी जवान चित्रपटामध्ये दीपिका पादूकोण हिने शाहरुखच्या (Shah Rukh Khan) आईची भूमिका साकारली होती..आता पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘किंग’ (King movie) चित्रपटात दिसणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत..(Entertainment news)
दरम्यान, ‘किंग’ चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हे अद्याप निर्मात्यांकडून समोर आले नाही. पण असं म्हटलं जात आहे की, किंग चित्रपटाचं कथानक २००० मध्ये आलेल्या ‘बिच्छू’ चित्रपटासारखेच आहे, जो चित्रपट फ्रेंच क्लासिक ‘लिओन: द प्रोफेशनल’ (१९९४) पासून प्रेरित झाला होता. दरम्यान, या चित्रपटात आधी सुहाना खानच्या (Suhana Khan) आई-वडिलांच्या भूमिकेसाठी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तब्बू (Tabbu) यांचा विचार केला जात होता. तसेच, या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ‘मुंज्या’ फेम अभय वर्माचीही (Abhay Verma) या चित्रपटात वर्णी लागली आहे. (Bollywood tadaka)
==================
हे देखील वाचा : म्हणून Divya Bharti अस्खलित मराठी बोलायच्या…
==================
‘किंग’ (King) चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच चित्रपटाची शुटींग सुरु होणार असून सर्व काही ठरल्या वेळेत झालं तर हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होईल असं सांगण्यात येत आहे. (Bollywood upcoming movie)