स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Chhaava चित्रपटातील काढून टाकलेला ‘तो’ सीन आला समोर!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे… १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि एक कुशल राजे म्हणून त्यांनी कारभार कसा सांभाळला याचा दैदिप्यमान इतिहास दाखवण्यात आला होता… बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता… चित्रपटातील कलाकारांचा अभिनय तर उतत्म होताच.. परंतु, प्रत्येक दृश्य अंगावर काटा आणणारी होती… मात्र, काही सीन्स चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते… आता ‘छावा’ मधील असाच एक डिलीट झालेला प्रसंग समोर आला आहे. (Laxman Utekar Movies)

‘छावा’ चित्रपटाचा १७ ऑगस्टला टेलिव्हिजवर वर्ल्ड प्रीमिअर झाला. त्यावेळी चित्रपटातील बरेच डिलीट करण्यात आलेले सीन प्रेक्षकांना बघता आले. यापैकी असाच एक छोटासा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये दिसतं की, छत्रपती संभाजी महाराज हातात तलवार घेऊन औरंगजेबासमोर उभे असतात. औरंगजेब शंभूराजांकडे निरखून बघत असतो. “मला पकडायला तू आला नाहीयेस. मीच तुला इथे बोलावलंय. कारण तू त्या गादीवर बसण्याच्या लायक नाहीस”, असं शंभूराजे औरंगजेबाला सांगतात. पुढे शंभूराजे तलवारीने औरंगजेबाला मारतात. तेवढ्यात औरंगजेब घाबरुन झोपेतून जागा होतो. कारण हे एक स्वप्न असतं. या सीनचं प्रेक्षकांनी कौतुक केलं असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे…(Bollywood News)

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिने महाराणी येसुबाईंची भूमिका उत्तम सादर केली होती… तर, औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना याने तंतोतंत साकारली होती… याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, आस्ताद काळे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर यांसारखे मराठी कलाकारही झळकले होते… ‘छावा’ चित्रपटाच्या बॉक्स कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाने देशभरात चित्रपटाने ६०० कोटी आणि जगभरात ८०० कोटींचा गल्ला जमवला आहे…
================================
=================================
लवकरच, विकी कौशल ‘महावता’र, ‘लव्ह एण्ड वॉर’ (Love and War) या चित्रपटात झळकणार आहे… तर, रश्मिका मंदाना हिची मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये एन्ट्री झाली असून आयुश्यमान खुरानासोबत ‘थामा’ (Thama Movie) चित्रपटात ती हटके भूमिका साकारताना दिसणार आहे… तसेच, या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायक साकारणार आहेत…(Bollywood upcoming Movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi