‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Tabu ‘या’ अभिनेत्यासोबत २७ वर्षांनी काम करणार; एकेकाळी दोघंही एकमेकांच्या होते प्रेमात
इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांची इतर मेल अॅक्टर्ससोबत नावं जोडली गेली किंवा त्यांचं रिलेशन त्यांच्यासोबत होतं; पण आजही त्या अविवाहित आहेत… या यादीत एक नाव कायमच घेतलं जातं ते म्हणजे तब्बूचं (Tabu)… ९०च्या दशकापासून आपल्या अभिनय आणि सौंदर्याने केवळ हिंदीच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीवरही अधिराज्य गाजवणारी तब्बू एकेकाळी नागार्जूनसोबत (Nagarjuna Akkineni) रिलेशनमध्ये होती… अर्थात त्या दोघांनी कधीच ऑफिशिअली त्यांच्या नात्याबदद्ल कधीच जाहिरपणे सांगितलं नसलं तरी त्यांची जवळीकता ९०च्या दशकात फार काही सांगत होती… त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही… आता जवळपास २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे कपल ऑनस्क्रिन एकत्र दिसणार असल्यामुळे लोकांची उस्तुकता वाढली आहे… (Nagarjuna and Tabu affair)

तर, नागार्जून यांचा इंडस्ट्रीतला १०० वा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे… ‘किंग १००’ (King 100) असं या चित्रपटाचं नाव असून याच चित्रपटात तब्बू आणि नागार्जूनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे… किंग १०० या चित्रपटाचं दिग्दर्शन तमिळ दिग्दर्शन आर.ए.कार्तिक करणार असून हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे…

दरम्यान, तब्बू आणि नागार्जून यांच्या रिलेशनबद्दल बोलायचं झालं तर, ९०च्या काळात दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते… १९९६ मध्ये आलेल्या ‘नीन्ने पेलडथा’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात जवळीकता वाढली होती.. त्यावेळी नागार्जूनचं लग्न झालं होतं… तब्बूवर प्रेम असूनही नागार्जून पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हता आणि त्यामुळेच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला… तब्बू आणि नागार्जून यांनी Aavida Maa Aavide (१९९८), Sisindri (१९९५) या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.. या व्यतिरिक्त तब्बूने आजवर तमिळ चित्रपटांमध्येही कामं केली आहेत… तसेच, ‘किंग १००’ सोबतच तब्बू विजय सेतुपतीबरोबरही एका चित्रपटात दिसणार आहे…
================================
हे देखील वाचा : Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi