Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Devmanus : ‘देवमाणूस’ परत येतोय…; नवा टीझर झाला प्रदर्शित
झी मराठी वाहिनीवर गेल्या काही काळात नव्या नव्या मालिका आणि कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. काही मालिकांना खुप टीआरपी मिळतोय तर काही मालिका अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे बंद करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात ‘झी मराठी’ने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनीवर अनेक महत्त्वाचे बदल केल्याचं पाहायला मिळालं. आणि आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा वाहिनीचे आकर्षित करण्यासाठी देवमाणूस ही मालिका भेटीला येणार आहे. (Devmanus daily soap)
सध्या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर लवकरच ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम सुरु होणार असून याचं सुत्रसंचलन श्रेयस तळपदे करणार आहे. आता याच मालिके पाठोपाठ सर्वाधिक टीआरपी मिळवणारा देवमाणूस परत येतोय. कारण, या मालिकेचे नाव घेतलं की डोळ्यांसमोर किरण गायकवाड (Kiran Gaikwad) येतोच. खलनायकाची कायमस्वरूपी लक्षात राहिल अशी भूमिका त्याने साकारली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या आग्रहामुळे देवमाणूसच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. (Marathi daily soaps)

“मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी…’देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! लवकरच…” असं कॅप्शन देत वाहिनीने या मालिकेची पहिली झलक सोशल मिडियावर शेअर केली आहे. पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली पाहायला मिळते. आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ‘देवमाणूस’ मालिकेचा मधला अध्याय केव्हा सुरू होणार, मुख्य भूमिकेत कोण झळकणार याची घोषणा ‘झी मराठी’कडून लवकरच करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. (Entertainment trending news)