
Dhadak 2 : तृप्ती डिमरीच्या रखडलेल्या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदिल
‘अॅनिमल’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा ‘धडक २’ (Dhadak 2 Movie) चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला होता. मात्र, अखेर सेन्सॉरने चित्रपटाला हिरावा कंदिल दिला असून वर्षभरापासून रखडलेला ‘धडक २’ लवकरच रिलीज होणार आहे. (Dhadak 2 movie)

२०१८ मध्ये आलेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटाचा ‘धडक २’ सीक्वेल असून पहिल्या भागात इशान खट्टर (Ishan Khattar) आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठीतील सुपरहिट ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचा ‘धडक’ हा रिमेक. तर, ‘धडक २’ चित्रपटात जातीयवाद दाखवला असल्याचं कारण देत चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आलं होतं. इतकंच नाही तर जोपर्यंत सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत चित्रपटाचं प्रमोशनही करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. आता, ‘धडक २’ ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात १६ कट करण्यास सांगितले आहेत. यामध्ये राजकीय किंवा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या काही संवादांमध्ये बदल सांगितले आहेत. (Bollywood news)
================================
================================
धर्मा प्रोडक्शन्स निर्मित आणि शाजिया इक्बाल दिग्दर्शित ‘धडक २’ चित्रपटात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणि २०२४ पासून रिलीजसाठी रखडलेला हा चित्रपट अखेर १ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. तसेच, लवकरच तृप्ती डिमरी पुन्हा एकदा माधुरी दीक्षितसोबत ‘मां बहन’ (Ma Behen) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या आधी दोघींनी भूल भूलैय्या ३ मध्ये स्क्रिन शेअर केली होती. (Entertainment news)