Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष शुट झालेल्या क्लासिक चित्रपटाचे किस्से
हिंदी चित्रपटांच्या आयकॉनिक चित्रपटांच्या यादीत ‘धडकन’ (Dhadkan) चित्रपटाचं नाव यायलाच हवं… २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिल्पा शेट्टी (Shila Shetty), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांच्या प्रमुख भूमिका होत्या… २५ वर्षांपूर्वी घवघवीत यश मिळवणारा ‘धडकन’ चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना परत राम अंजली आणि देव यांचा लव्ह ट्रायअॅंगल पाहण्याची संधी रि-रिलीजच्या ट्रेण्डमुळे मिळणार आहे. रि-रिलीजच्या तारखेसोबतच धडकन चित्रपटाचे काही किस्से नक्की वाचा…(Bollywood re-release trend)

तर, २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ चित्रपटाला २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. आणि आता हा आयकॉनिक चित्रपट डिजिटली रीमास्टर आवृत्तीत परत येत आहे. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट रि-रिलीज होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्लासिक कथेसोबतच आयकॉनिक गाणी देखील प्रेक्षकांना पुन्हा पाहण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळणार आहे. (Bollywood news)

‘धडकन’ चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहित आहे का? ‘धडकन’ चित्रपटाचा शेवट वेगळाच होता आणि तो शुट देखील करण्यात आला होता. शिल्पा शेट्टी हिने एका मुलाखतमध्ये याबद्दल खुलासा करताना असं म्हटलं होतं की, “आधी ‘धडकन’चा क्लायमॅक्स वेगळा होता. मी रामच्या मुलाची आई होणार आहे, असं अंजली देवला सांगते आणि हे ऐकून देवचा मृत्यू होतो, असा क्लायमॅक्स आधी ठरवण्यात आला होता. तो तसा शूटही झाला होता. मात्र, हा क्लायमॅक्स बराच ट्रॅजिक आणि दु:खी वाटल्यामुळे ऐनवेळी तो बदलण्यात आला आणि सरतेशेवटी देव महिमासोबत निघून जातो असं दाखवण्यात आलं.” (Dhadkan movie untold stories)

इतकं च नव्हे तर, आधी सुनील शेट्टीलाच देवच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आलं होतं. पण त्याला इतर चित्रपटांच्या शुटींगमुळे धडकनचं शुट जमत नव्हतं. आणि त्यामुळे त्याच्याजागी दुसऱ्या एका अभिनेत्याला घेऊन शुट केलं गेलं. पण दिग्दर्शकाला हवं तसं तो अभिनता काम डिलीव्हर न करु शकल्यामुले पुन्हा एकदा सुनील शेट्टीलाच बोलावून चित्रपटाचं शुटींग पुर्ण केलं होतं. आणि या सगळ्यात तब्बल ५ वर्ष धडकन चित्रपटाचं शुटींग सुरु होतं.(Entertainemnt)
================================
हे देखील वाचा: Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
=================================
‘धडकन’ चित्रपटात शिल्पा शेट्टीने ‘अंजली’ची भूमिका साकारली होती. तर, सुनील शेट्टीने तिचा प्रियकर ‘देव’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमारने शिल्पाचा पती ‘राम’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात किरण कुमार, कादर खान व परमित सेठी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. शिवाय, ९ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या धडकन चित्रपटाने २००० साली २६.४७ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा धडकन फॅन्सना रोमॅंटिक फिल्मी दुनियेत जाण्याची सुवर्णसंधी रि-रिलीजमुळे लाभली आहे. (Movie Re-release trend)
