Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Dhanush सोबत रिलेशनशिपच्या चर्चेत Mrunal Thakur हिच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष!
‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2 Movie) चित्रपटामुळे सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) चांगलीच चर्चेत आहे… मात्र, आता चित्रपटासोबतच साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि मृणाल एकमेकांना डेट करत असण्याच्या चर्चांना खास उधाण आलं आहे… सोशल मिडियावर अलिकडेच दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये धनुषने मृणालचा हात हातात धरला होता आणि दोघे गप्पा मारत होते… त्यामुळे आता टाऊनमध्ये नवं कपल आलं आहे अशी रंगलेली चर्चा किती खरी आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा आहे… (Bollywood News)

मिळालेल्या माहीतीनुसार असं सांगितलं जात आहे की, गेल्या काही काळापासून धनुष आणि मृणाल एकमेकांना डेट करत आहेत…अदयाप दोघांकडून यावर काहीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही आहे…मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मृणालचं जुन्या मुलाखतीतील एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत मृणालने म्हटलं होतं, “अजूनही खूप गोष्टी करायच्या आहेत. मी ते पूर्ण केल्यावरच त्याबद्दल बोलेन. कारण मला कुणाची नजर लागू द्यायची नाही. खूप नजर लागते”. (Entertainment News)

पुढे मृणाल म्हणाली की, “काहीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. माझं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. लोक पुढच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलतात, पण मी तसं करत नाही. सगळ्यांना माहिती असतं काय येणार आहे आणि काय नाही. मी सतत त्याचा विचार करत नाही. मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे”.
================================
हे देखील वाचा : एकुलत्या एका मुलाच्या लग्नपत्रिकेवर Ramesh Bhatkar यांचं नाव का नव्हतं?
=================================
दरम्यान, धनुषने आधी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी लग्न केलं होतं. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता… धनुषच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, धनुष आणि क्रिती सनॉनचा ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा कुबेरा हा चित्रपट रिलीज झाला होता…(Dhanush and Mrunal Thakur date news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi