
Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित
साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा आगामी चित्रपट ‘इडली कडई’ (Idli Kadai) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेस नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सुरुवातीला १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही अडचमींमुळे तारीख पुढे घेऊन जात, आता ‘इडली कडई’ हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (South upcoming film)

धनुषने (Dhanush) त्याच्या सोशल मीडियावरून ‘इडली कडई’ (Idli Kadai) चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘इडली कडई’ हा धनुषचा चौथा दिग्दर्शित चित्रपट असून, त्याने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निथ्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज, पी. समुथिरकणी आणि राजकिरण असे कलाकार दिसणार आहेत. (Tamil films)

तसेच, लवकरच ‘रांझना’ या गाजलेल्या आणि कल्ट फॅन फॉलॉईंग असलेल्या चित्रपटानंतर ‘तेरे इश्क में’ (Tere Isha mein) देखील लवकरच येणार आहे. या चित्रपटात धनुषसोबत क्रिती सेनॉन (Kristi Sanon) झळकणार आहे. कुंदनची गोष्ट संपल्यानंतर शंकरची नवी प्रेमकहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Bollywood film update)