Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना
आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांजना’ (Raanjhana) चित्रपटाने लोकांना वेड लावलं होतं… २०१३ मध्ये रिलीज झालेल्या या बॉलिवूड चित्रपटात धनुष, सोनम कपूर आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या… चित्रपटाच्या कथेची गरज आणि एका महत्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या शेवटी कुंदनचा मृत्यू दाखवण्यात आला होता… मात्र, आता रांजना नुकताच रि-रिलीज करण्यात आला असून AI द्वारे चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला आहे… यावर आता धनुषने (Dhanush) देखील प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे… काय म्हणाला आहे धनुष जाणून घेऊयात…

धनुषने एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “एआय द्वारे बदललेल्या ‘रांझना’ला रिलीज केल्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झालो आहे. या नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा हिरावून घेतला आहे. माझ्या स्पष्ट आक्षेपाला न जुमानता संबंधित लोकांनी हे केले”. (Bollywood latest news)

पुढे धनुषने त्याच्या पोस्टमध्ये एआयबद्दल एक मोठी भविष्यवाणी व्यक्त करत लिहिलं आहे की, “हा तो चित्रपट नाही ज्यासाठी मी १२ वर्षांपूर्वी सहमत झालो होतो. चित्रपट किंवा आशय बदलण्यासाठी एआयचा वापर हा कला आणि कलाकार दोघांसाठीही चिंतेचा विषय आहे. कथाकथनाच्या कलेसाठी आणि चित्रपटाच्या वारशासाठी हा एक मोठा धोका आहे. भविष्यात अशा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर नियम केले जातील अशी मला मनापासून आशा आहे”. दरम्यान, धनुषसोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद यांनी देखील काही दिवसांपूर्वीच रांजना चित्रपटाच्या बदलत्या क्लायमॅक्स बद्दल नाराजी व्यक्त केली होती… (Dhanush Movies)
================================
=================================
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘रांजना’ चित्रपटात धनुष, सोनम कपूर, अभय देओल, स्वरा भास्कर, मोहम्मद झिशान अय्यूब यांच्या प्रमुख भूमिका होत्या…तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०५ कोटींची कमाई केली होती… आता लवकरच रांजना चित्रपटाच्या युनिवर्समधला ‘तेरे इश्क मे’ (Tere Ishq Mein) हा चित्रपट येणार असून यात धनुष आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi