Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं

जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Big Boss Marathi : पुणेकर दुपारी १ ते ४ का

Priya Bapat-Umesh Kamat तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार!

Ajay Devgan : “ही ऑस्कर लेवलची कोरिओग्राफी कोणी केली?”; ‘सन

सुपरस्टार Dev Anand पाहायचे ‘हा’ मराठी कार्यक्रम!

Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dharmatma : ‘धर्मात्मा’ची ५० वर्ष पुर्ण; ‘गॉडफादर’शी तुलना शक्यच नाही….

 Dharmatma : ‘धर्मात्मा’ची ५० वर्ष पुर्ण; ‘गॉडफादर’शी तुलना शक्यच नाही….
कलाकृती विशेष

Dharmatma : ‘धर्मात्मा’ची ५० वर्ष पुर्ण; ‘गॉडफादर’शी तुलना शक्यच नाही….

by दिलीप ठाकूर 07/05/2025

एखाद्या विदेशी चित्रपटावर आधारित एखादा हिंदी चित्रपट येतोय म्हटल्यावर आम्हा त्या काळातील चित्रपट रसिकांची संमिश्र भावना असायची. विदेशातील चित्रपट रसिकांना आवडलेल्या गोष्टी आपल्याला हिंदी चित्रपटात पाहायला मिळतील असे एकिकडे वाटत असतानाच त्या गोष्टी आपल्याला रुचलीत, पटतील, आपल्याला आवडतील ना असे केवढे तरी प्रश्न. त्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्समधील ‘स्टॉलच्या पब्लिक’ला इंग्लिश चित्रपट (मग तो युरोपीयन असो वा अमेरिकन) खूपच लांबचा वा परका वाटे. तो दक्षिण मुंबईतील हायफाय स्टाईलीश चित्रपटगृहात ( इरॉस, स्टर्लिग, रिगल) प्रदर्शित होतो अथवा मुंबईतील श्री, रिव्होली अशाच काही चित्रपटगृहात तो प्रदर्शित होतो, तो पाहायला सुटाबुटात जावे लागते, त्यापेक्षा आपला मसालेदार मनोरंजक चित्रपट बरा. टाळ्या नि शिट्ट्यांनी एन्जॉय करता येतो अशी सवय, संस्कृती व आवड होती. त्यांनीच आपल्या देशात चित्रपट रुजवला. (Bollywood dhamaka)

 अशातच बहुचर्चित ‘गॉडफादर’ या चित्रपटावरुन फिरोज खान ‘धर्मात्मा’ अभिनीत, निर्मित व दिग्दर्शित करतोय ही बातमी भारी वाटली. आज डिजिटल युगात एका क्लिकसरशी जगभरातील कोणत्याही विषयावरील माहिती मिळतेय ( त्या उपलब्ध माहितीच्या पलिकडेही खूपच मोठे जग आहे, गोष्टी आहेत). पन्नास वर्षांपूर्वी मराठी प्रसार माध्यमातून विदेशी चित्रपटांना फारसे महत्व मिळत नसे. तात्पर्य, ‘गॉडफादर’ किती नि कसा भारी चित्रपट आहे याची तेव्हा पूर्वकल्पना नव्हती. माहित होता,  फिरोज खान. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक स्टायलिश, रुबाबदार, हिकमती कलाकार. अभिनेता म्हणून तो फार ग्रेट वगैरे कधीच ओळखला गेला नाही. नामांकित अभिनेत्री त्याच्यासोबत काम करताहेत म्हणून त्याला ‘लेडी किलर’ हिरो म्हणत हे जणू त्याचे यश. हळूहळू  ‘गॉडफादर’ चे महत्व समजले. १९७२ सालचा हा बहुचर्चित चित्रपट. मारिओ पुझो  यांच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीवर आधारित चित्रपट. दिग्दर्शक फ्रान्सीस फोर्ड कोप्पोला आणि प्रमुख भूमिकेत मार्लिन ब्रान्डो व अल पचिनो. अशा सॉलिड चित्रपटावर आधारित फिरोज खान पिक्चर बनवतोय याचं कौतुक होत. तो हाॅलीवूड चित्रपटाचा बेहद्द चाहता. त्यातूनच त्याला हे सुचले असेल. (Godfather movie)

  सुरुवातीस राजेश खन्नाला त्याने नायकाची भूमिका ऑफर केली आणि डॅनीनी साकारलेली भूमिका करणार होता. राजेश खन्ना सुपर स्टार क्रेझमध्ये उगाच अधिकाधिक चित्रपटात काम करत होता. त्याचे दुष्परिणाम झालेच. आणि त्यातच काही चित्रपट त्याने नाकारले (‘धर्मात्मा’ प्रमाणेच मोहनकुमार दिग्दर्शित ‘अमीर गरीब’ हा त्याने नाकारला व देव आनंदने केला.) ” धर्मात्मा ” चित्रपटात राजेश खन्ना खरच शोभला असता का याचा विचार आता कशाला? (Entertainemnt)

‘ धर्मात्मा’ निर्मितीत रंजक गोष्टी अनेक.

 अफगाणिस्तानात काबूल वगैरे ठिकाणी ‘धर्मात्मा’ चे चित्रीकरण होणार असून तसे होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ही या गोष्टीने तर भारीच वाटले. तोपर्यंत हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना प्रामुख्याने हिंदी चित्रपटात युरोप, अमेरिका पाह्यला मिळत होती. सिनेमाच्या  एका तिकीटात विदेश वारी याचच अप्रूप होते. युरोप वगैरेच्या वाटेला न जाता चक्क अफगाणिस्तान ही कमालच म्हणायची. प्रचंड वाळवंट आणि दूरदूरवर वस्ती. प्रचंड उन्हातान्हातील जगणं…..काबूल विमानतळावर फिरोज खान, हेमा मालिनी, डॅनी, रणजित वगैरे कलाकार उतरले तेव्हा त्यांचे अतिशय भव्य स्वागत झाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट स्थानिक दूरचित्रवाणीवरही हे दाखवले गेले. फिरोज खान व त्याचा भाऊ संजय खान यांचे आखाती देशातील संबंध ही कायमच चर्चेची गोष्ट. आणि त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात त्याचे अनेकदा दर्शन. (Dharmatma movie stories)

=================

हे देखील वाचा : Dada Kondke यांचे हिंदीतील पहिलेच पाऊल ज्युबिली हिट

=================

हेमा मालिनीने ‘धर्मात्मा’ चित्रपट स्वीकारल्यावर काहींनी तिला हा निर्णय चुकीचा आहे, असे म्हटल्याचे कालांतराने एका मुलाखतीत तिने सांगितले. एफ. के. प्रोडक्शनचे युनिट विश्वासार्ह नाही असे काही सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत हेमा मालिनीने या चित्रपटात काम केले. अतिशय उत्साहात केल्याचे पडद्यावर दिसतेय. मात्र तिने फिरोज खानला चुंबन दृश्यात आवश्यक त्या मर्यादांची जाणीव दिल्याचा किस्साही गाजला. (Bollywood gossips)

 तर, यात हेमा मालिनीसोबत काही दृश्यात काम करण्याची संधी आहे, म्हणून ‘धर्मात्मा’ साईन करीत अफगाणिस्तानला चल, ‘ शोले’त संजीवकुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन असे तीन नायक असल्याने तुला किती संधी मिळणार? असे फिरोज खानने वारंवार सांगितलेले डॅनी डेन्झोपाला पटले आणि त्याने गब्बरसिंगची भूमिका नाकारली. (पडद्यामागची ही गोष्ट रणजीतने मला एका मुलाखतीत सांगितली.) ‘शोले’ च्या पहिल्या सिटींगला डॅनी असल्याचा फोटो आज सोशल मिडियात पाहायला मिळतोय. (Sholay movie)

प्रेमनाथने साकारलेल्या भूमिकेसाठी फिरोज खानने एका फिल्मी पार्टीत शम्मी कपूरला विचारले असता तो खवळला, त्याला हे अनपेक्षित होते. पार्टीतच दोघांचे सुरु झालेले भांडण मिटवले गेले त्याची गाॅसिप्स मॅगझिनना खबर लागलीच. रेखासाठी हा मोठ्या सेटअपचा चित्रपट होता. ( भूमिका छोटी आहे म्हणत,  झीनत अमानने नकार दिल्यावर फिरोज खानने रेखाचा विचार केला.) तिच्या कारकिर्दीचा हा सुरुवातीचा टप्पा. शक्यतो नवीन चित्रपट नाकारु नये अशी परिस्थिती. चित्रपटाचे जग अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींनी भरलयं. रेखाचंही तसं हो नाही चाललेय. पण फिरोज खान कलाकारांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी ख्यातनाम हेही होकाराचं कारण असू शकते. (Entertainment tadaka)

 अफगाणिस्तानातील मोठ्या चित्रीकरण सत्रानंतर मुंबईतील स्टुडिओत सेट लावून इनडोअर शूटिंग पार पडत पडत ‘धर्मात्मा’ पूर्ण होत आला. चित्रपटात फिरोज खान, हेमा मालिनी, रेखा ( विशेष भूमिकेत), रणजीत, डॅनी डेन्झोपा आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका. त्यासह नादिरा, फरिदा जलाल, हेलन, सुलोचनादीदी, जाहिरा, नाना पळशीकर, मदन पुरी, इम्तियाज खान, मोहन चोटी, दारासिंग, जगदीश राज,  सत्येन कप्पू, सुधीर असे अनेक कलाकार. हबिब यानेही ‘शोले’तील कालिया नाकारुन ‘धर्मात्मा’ स्वीकारला. ( ती भूमिका विजू खोटेनी केली.) चित्रपट पूर्ण होत असतानाच चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. इंदिवर यांच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आणि चित्रपटातील चारही गाणी श्रोत्यांपर्यंत येताच लोकप्रिय. क्या खूब लगती हो ( पार्श्वगायक मुकेश व कंचन), मेरी गलियों मे लोगों की ( लता मंगेशकर व महेन्द्र कपूर), तुमने किसीसे कभी प्यार किया है ( मुकेश व कंचन), तेरे चेहरे मे जो जादू है ( किशोरकुमार). सुपरहिट गाण्यांनी चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता विलक्षण वाढते. (Untold stories)

   ….आणि अशातच ‘धर्मात्मा’ मधील काही दृश्यांना सेन्सॉरने कैचीत पकडले. फिरोज खानने मुंबईत चित्रपट प्रदर्शित करण्याची अतिशय जोरदार तयारी केली होती ( त्यानंतर टप्प्याटप्प्याने नवी दिल्ली, पूर्व पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश असा इतरत्र चित्रपट प्रदर्शित होणार असे नियोजन. त्या काळात असेच होई.) सेन्सॉरने त्यात जणू खो घातला. फिरोज खानने आपले प्रयत्न सुरु केले. चित्रपटाला काही दृश्यांवर काटछाटसह “फक्त प्रौढांसाठी”  प्रमाणपत्र मिळाले. असे करत करत अखेर ९ मे १९७५ रोजी मुंबईत ‘धर्मात्मा’ प्रदर्शित करायचे ठरले. मेन थिएटर लिबर्टी. मुंबईत गीता, गणेश, धरती, बरखा, रुपम, न्यू टाॅकीज, मिलन, चंदन इत्यादी अनेक चित्रपटगृहात दाखल. (Dharmatma movie story)अशा धमाकेदार ‘धर्मात्मा’ ला चक्क पन्नास वर्ष पूर्ण झाली देखील. कधी सरला हो इतका काळ?

 ‘अपराध’  (१९७२) च्याच दिग्दर्शनात फिरोज खान हा पाश्चात्य ढंगाचा स्टायलिश चित्रपट हेच आपले वैशिष्ट्य ठरवणार, हाच त्याचा फोकस असणार हे अगदी स्पष्ट होते. ‘धर्मात्मा’ मध्ये त्याने ते जास्त प्रमाणावर अधोरेखित केले. (त्यानंतरही कुर्बानी, जहांबाझ वगैरेत आपला तोच ट्रॅक कायम ठेवला. कधी त्यात यश मिळाले, कधी डाव फसला. तरी तो हटला नाही.) स्वतः फिरोज खान काऊबाॅय रुपात. धिप्पाड शरीरयष्टी, पाश्चात्य स्टाईलचे कपडे, जगावेगळी टोपी  अशी स्वतःची देखणी सजावट करुन पडद्यावर वावरणार ही फिरोज खानची खासियत. (Feroz khan)

========

हे देखील वाचा : काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”

========

 चित्रपटात अफगाणिस्तानातील Buzkashi हा थरारक खेळ पाहायला मिळतो. चित्रपटात अतिरंजितपणा बराच. पण तोच दाखवायचाय अशी जणू मांडणी. अफगाणिस्तान दर्शन भन्नाट नि भरपूर. हिंदीत आपण विदेशी चित्रपट पाहतोय की काय असा फिल. काही समिक्षकांनी मात्र यापेक्षा मूळ चित्रपट ‘गॉडफादर’ बघा. हा चित्रपट त्याच्या जराही आसपास जात नाही असे म्हटले.  ण फिरोज खान अशा गोष्टींकडे कशाला पाहिल? स्वतःच्या चित्रपटावर कायमच खुश असणारा असाच हा फिल्मवाला. (bollywood)

 चित्रपटाला चांगले यशही मिळाले. गाणीही लोकप्रिय. या गुणांवर काही वर्षांनी रिपीट रन, मॅटीनी शोला धर्मात्मा हमखास गर्दी खेचू लागला. ‘धर्मात्मा’ चित्रपटाला आपली एक ओळख नक्कीच आहे. आणि तेच फिरोज खानचे मोठेच यश ‘गॉडफादर’  वर आधारित हिंदीत आणखीन काही चित्रपट आले, पहिला ‘धर्मात्मा’ आला. त्याचे हिंदीकरण जास्त झाले म्हणून तो स्वीकारला गेला. अन्यथा दिग्दर्शनात पाऊल टाकताच शम्मी कपूरने ‘इर्माला डूस’ या विदेशी कलाकृतीवर आधारित ‘मनोरंजन’ बनवला. तो साफ कोसळला. आजही ‘धर्मात्मा‘चित्रपट फोकसमध्ये आहे. तर मग आणखीन काय हवे? (Indian cinema)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan bollywood classic movies Bollywood gossips dharmatma movie Dharmendra Entertainment entertainment tadaka feroz khan Hema Malini rekha Sholay
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.