दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
धुल की फूल (1959)
निर्देशक – यश चोप्रा (पहिला चित्रपट) संगीत – एन. दत्ता
गीतकार – साहिर लुधियानवी, कामिल रशीद, मजरुहू सुलतान पुरी व दीपक
कलाकार- माला सिन्हा, राजेंद्र कुमार, नंन्दा, अशोककुमार, मनमोहन कृष्ण मेहमूद, लीला चिटणीस
प्रेम हा फक्त दोन प्रेमिजीवांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी बेजबाबदार प्रेमसम्बंध व त्यातून निर्माण होणारी अनौरस संतती, तिचे पालन, मिळणारे संस्कार या सारखे अनेक प्रश्न समाजाला भेडसावत असतात. चोप्रांच्या धूल का फूल (Dhool Ka Phool) ची रोशनची कथा पं. मुखरात्र वर्णांची होती तर निर्देशन यश चोप्रांनी केले होते. कथानक साहिरच्या गीताने व एन दत्तांच्या संगीताने फूलत जाते. कॉलेजच्या स्नेह्संमेलानात महेश कपूर (राजेन्द्र कुमार) व मीना (माला सिन्हा) यांच्या प्रीतीला अंकुर फुटतो.
हे देखील वाचा: बी आर चोप्रांनी निर्देशित केलेला हा प्रथम चित्रपट तुम्ही पाहिला आहे का ?
प्रेमाच्या खेळात मुली या मलांपेक्षा थोड्या अधिक सावध धोरणी व समजूतदार असतात. निसर्गाच्या सानिध्यात एकांतात त्या प्रेमी जीवांच्या धुंद प्रणयाराधानाला रंग चढतो. त्या बेहोशीत कुंवारी मीना महेशच्या बाळाची आई बनते. महेश बापाच्या दबावामुळे, श्रीमंत बापाच्या कन्येशी नंदाशी विवाह करतो. कुमारी माता मीना समाजाला घाबरून त्या अपत्याच्या त्याग करते. अल्लड अवखळ प्रेमीचे आता जबाबदार माते मध्ये रुपांतर झालेले असते. कुणालाही सांगता येणार नाही असे मानसिक दुःख व मनाला सतत बोचणारी अपराधीपणाची भावना मीनाला उध्वस्त करुन टाकते.
मीराने ते फेकुन दिलेले ते अनौरस मुल गरीब दयाळू अब्दुल चाचाकड़े वाढते. मुलाचा पुर्व इतिहास माहित नसल्याने अब्दुल चाचा त्या हिन्दू मुलाचे नामकरण रोशन करतो, त्याच्यावर मानवतावादी संस्कार करतो. एकीकडे महेश सोईस्करपणे तारुंण्याच्या धुंदीत केलेले पाप विसरुन गेलेला असतो. आपली पत्नी (नंदा) व लहान मुलगा रमेश (डेझी ईराणी) सह सुखाचा संसार करत असतो. पुढे तो न्यायदान करणारा मॅजेस्ट्रेट बनतो. ज्याने स्वताच एकेकाळी आपल्या प्रेयसीवर घोर अन्याय केलेला असतो.
कुमारी माता मीना आपला शर्मनाक भुतकाळ विसरुंन जगदीश नामक (अशोक कुमार) वकिलाशी विवाह करते. सभ्यसमाजाने बहिष्कृत केलेल्या रोशनला त्या मासूम जीवाला (सुशील कुमार) क्षणोक्षणी अपमान सहन करीत जगावे लागते. नाईलाजाने शेवटी तो वाईट संगतीला लागतो व चोर बनुन त्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या कोर्टात आरोपी बनून उभे रहावे लागते. मीनाला विशाल अंतकरणाने पत्नी म्हाणून स्वीकारणारा वकिल जगदीश संपूर्ण ताकदीनिशी रोशनच्या मागे उभा राहतो. कोर्टातील नाट्यपुर्ण प्रसंगात समाजातील खरे प्रतिष्ठित गुन्हेगार कोण आहेत ते उघड होते.