Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…

 Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…
कलाकृती तडका

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…

by रसिका शिंदे-पॉल 27/04/2025

महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्रित अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘धुमधडाका’. हिंदीतील ‘प्यार किए जा’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक. धुमधडाका हा चित्रपट म्हटलं की असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी पहिला महत्वाचा सीन म्हणजे म्हातारे अशोक सराफ आणि त्यांच्या तोंडी असणारे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द. पण नेमकी हे शब्द आले कुठून याची एक रंजक गोष्ट अशोक सराफ यांनी सांगितली आहे. (Mahesh Kothare)

अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मॅजिक १०६ एफएमला दिलेल्या मुलाखतीत व्याख्या, विख्खी, वुख्खू या डायलॉगमागचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. अशोक सराफ म्हणाले की, “व्याख्या, विख्खी, वुख्खू हा डायलॉग इतका प्रसिद्ध होईल, असं वाटलंदेखील नव्हतं. त्यावेळेला माझ्याकडून चुकून झालेली ती अॅक्शन होती. ती पुढे कन्टिन्यू केली. व्याख्या, विख्खी, वुख्खू कुठून निघतं? हे स्क्रीप्टमध्ये लिहिलेलं नव्हतं. ते माझं मीच बोललो होतो. जेव्हा धनाजीराव वेष बदलून येतो. मुलाचा बाप बनून येतो तेव्हा तो गेटअप बदलला आणि त्याच्या हातात पाइप दिला. पाइपमधला तंबाखू ओढणे खूप कठीण असतो. तो घश्याला लागतो.समोर शरद तळवळकर उभे होते. मी तोंडात पाइप पकडून काय वाकडोजी धने असा डायलॉग बोलतो. त्यांचं नाव मी कधीच सरळ घेतलं नाही. धणेजी वाकडे काय वाटेल ते नाव घ्यायचो. मी बोललो माळी बुवा आणि तंबाखू घशाला बसला. तेव्हाच माझ्या तोंडून व्याख्या असं शब्द बाहेर पडला. मग तिथे कट म्हटलं. पण त्यावेळी डोक्यात आलं की हेच कन्टिन्यू केलं तर मग मी ते डायलॉग बोललो”. (Ashok saraf iconic dialoges)

दरम्यान, ‘धुमधडाका’ हा चित्रपट ‘प्यार किए जा’ (Pyaar kiye Ja) या हिंदी चित्रपटाचा अधिकृत मराठी रीमेक होता. या चित्रपटात महेश कोठारे, अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Lasmikant berde) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘धुमधडाका’ चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना महेश यांनी चक्क १ रुपया देत साईन केलं होतं.

==============

हे देखील वाचा : Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ १ रुपया देऊन ‘या’ दिग्दर्शकाने केले होते साईन

==============

याबद्दल बोलताना महेश म्हणाले होते की, ‘मी तिकडे लक्ष्याला पाहिलं आणि मी खूपच प्रभावित झालो होतो. मी त्याला म्हटलं, मला मेहमूदच्या भूमिकेसाठी अभिनेता सापडला.त्याने ही भूमिका करावी शी इच्छा मी लक्ष्याला बोलून दाखवली. आणि ‘मी त्याला सायनिंग अमाउंट म्हणून १ रुपया दिला आणि त्याने सुद्धा तितक्याच गांभीर्याने माझ्याकडून तो एक रुपया घेतला. तेव्हा माझ्या फायनान्सचा पत्ता नव्हता, पटकथादेखील व्यवस्थित तयार नव्हती.’ आणि अखेर सगळी पात्र नक्की झाल्यावर ‘धुमधडाका’ चित्रपट यशस्वीपणे मोठ्या प़डद्यावर झळकला होता. (Dhum Dhadaka movie making story)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Bollywood Celebrity News dhum dhadaka movie Entertainment Featured Laxmikant Berde Mahesh Kothare marathi classic movies sharad talvalkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.