
Ranveer Singh : ‘धुरंधर’चं वादळ थांबेना; दुसऱ्या आठवड्यातच पार केला ४५० कोटींचा टप्पा!
२०२५ वर्ष सरत आलं… या वर्षात बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. या वर्षाची सुरुवात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने केली होती… बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत ५०० कोटींचा या वर्षाचा पहिला टप्पा पार करणारा ‘छावा’ ठरला होता… विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याचा आणखी एक चित्रपट आता स्वतं:च्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढणार आहे… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने लोकांना वेड लावलं आहे… चित्रपटाचा हिरो जरी रणवीर सिंग (Ranveer Singh) असला तरी चर्चा मात्र अक्षय़ खन्नाचीच आहे… ५ डिसेंबर २०२५ ला रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ ने सलग दुसऱ्या आठवड्यात ३ दिवस छप्पर फाड कमाई केली आहे… जाणून घेऊयात रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि या चित्रपटाने कोणकोणते रेकॉर्ड मोडले आहेत… (Bollywood Movie 2025)

तर, सर्वात आधी पहिल्या दिवसापासून ते अकराव्या दिवसापर्यंत ‘धुरंधर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकूयात… सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी २८ कोटी, दुसऱ्या दिवशी ३२ कोटी, तिसऱ्या दिवशी ४३ कोटी, चौथ्या दिवशी २३.३५ कोटी, पाचव्या दिवशी २७ कोटी, सहाव्या दिवशी २७ कोटी, सातव्या दिवशी २७ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०७.२५ कोटींची कमाई केली होती… ‘धुरंधर’ने दुसऱ्या आठवड्याचीही थिएटरमध्ये दमदार सुरुवात करत सलग ४ दिवसांमध्ये १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसऱ्या आठवड्याची आकडेवारी पाहता आठव्या दिवशी ३४.७० कोटी, नवव्या दिवशी ५३.७० कोटी, दहाव्या दिवशी ५८.२० कोटी, अकराव्या दिवशी ३१.८० कोटी, बाराव्या दिवशी ३२.१० कोटी कमावत एकूण ४२८.५० कोटींची कमाई केली आहे. महत्वाचं म्हणजे धुरंधर चित्रपटाने रणवीर सिंगच्या स्वत:च्याच पद्मावत (Padmaavaat) चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे… २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘पद्मावत’ने ३०२.१५ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे…

बरं ‘धुरंधर’ चित्रपटाचे रेकॉर्ड इथवरच थांबत नाहीत… दुसऱ्या वीकेंडमध्ये तगडी कमाई करणाऱ्या बॉलिवूडच्या टॉप १० चित्रपटांमध्ये ‘धुरंधर’ पहिल्या क्रमांकावर आहे… ‘अॅनिमल’, ‘बाहुबली २’, ‘पुष्पा २’ (Pushpa 2) चित्रपटांचेही धुरंधरने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत… तर आदर्श यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार सेकंड वीकेंडला कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पुढीलप्रमाणे – ‘धुरंधर’ १४६.६० कोटी, ‘पुष्पा २’ (हिंदी) १२८ कोटी, ‘छावा’ १०९.२३ कोटी, ‘स्त्री’ ९३.८५ कोटी, ‘गदर २’ ९०.९७ कोटी, ‘अॅनिमल’ ८७.५६ कोटी, ‘जवान’ ८२.४६ कोटी, ‘बाहुबली २’ (हिंदी) ८०.७५ कोटी, ‘सैय्यारा’ ७५.५० कोटी आणि ‘दंगल’ ७३.७० कोटी… (Entertainment News)

तसेच, ओपनिंग वीकेंडला १०३ कोटी कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे… या व्यतिरिक्त सातव्या दिवशी २७ कोटी कमावणारा हा पहिला A रेटेड चित्रपट ठरला आहे… रिलीजच्या आठव्या दिवशी ३२.५० कोटी कमावणारा हा बिगेट हिंदी चित्रपट ठरला आहे… शिवाय, नवव्या आणि दहाव्या दिवशी ५३ आणि ५८ कोटी कमावणारा हा बिगेस्ट बॉलिवूड चित्रपटही बनला आहे… इतकंच नाही तर दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत सलग शुक्रवार, शनिवार आणि रविवार ११० कोटी पार करणारा हा सर्वात मोठा चित्रपट आहे, जगभरात आत्तापर्यंत ५८८ कोटी ११ दिवसांमध्ये कमवतरणवीर सिंगचा हा Highest Grossing चित्रपट असून सरतेशेवटी २०२५ मधला सर्वाधिक कमाई करणारा A Rated चित्रपट म्हणून धुरंधर बॉक्स ऑफिसवर अग्रसेर ठरला आहे… इतकंच नाही तर २०२५ चा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाने ६०० कोटी कमवण्यासाठी ६ आठवडे लावले होते. पण इथे रणवीर सिंगच्या चित्रपटाने केवळ २ आठवड्यातच ४८० कोटींपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे २०२५ मधला सर्वाधिक कमाई करणारा धुरंधर चित्रपट ठरेल असा अंदाजही बांधला जात आहे. (Bollywood Movie Box Office Collections 2025)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?
================================
तर, दुसरीकडे अक्षय खन्ना याचा २०२५ मधील छावा नंतर हा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे… ‘छावा’ चित्रपटापूर्वी २०२२ मध्ये रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘दृश्यम २’ (Drishyam 2) चित्रपटाने २४०.५४ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे…. त्यामुळे आता अक्षयचा ‘छावा’ नंतर ‘धुरंधर’ हा दुसरा चित्रपट ठरेल जो ५०० कोटी पार करणार आहे… तसेच, रणवीर सिंगच्या फिल्मी करिअरमधला हा पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने ४०० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच ५०० कोटींकडे आपली वाटचाल सुरु केली आहे… इतकंच नाही तर ‘धुरंधर’चं लाईफटाईम कलेक्शन ७०० कोटींपर्यंत जाऊ शकतं असा अंदाजही बांधला जात आहे… त्यामुळे येत्या काळात ‘धुरंधर’ आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Dhurandhar movie box office records)

जर का ‘धुरंधर’ चित्रपटाचा रनटाईम ३ तास ३२ मिनिटे असेल तर १७ वर्षातील सर्वात जास्त रनटाईम असणारा हा एक चित्रपट ठरला आहे…याआधी २००८ मध्ये आलेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटाने हा रेकॉर्ड केला होता ज्याचा रनटाईम ३ तास ३४ मिनिटे होता.. याव्यतिरिक्त ‘एलओसी कारगिल’ (४ तास ०७ मिनिटे), ‘लगान’ (३ तास ४४ मिनिटे) आणि ‘मोहब्बतें’ (३ तास ३५ मिनिटे), ‘सलाम-ए-इश्क’ (३ तास ३६ मिनिटे), अशी बॉलिवूडच्या सर्वात तास असणाऱ्या चित्रपटाची नावं आहेत… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi