‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Dia Mirza : ‘रेहना है तेरे दिल में’ फ्लॉप होता की हिट?
९०च्या दशकातील प्रत्येकाच्या रोमॅंटिक चित्रपटांच्या लिस्टमध्ये दिया मिर्झा आणि आर. माधवन यांचा ‘रेहना है तेरे दिल में’ हा चित्रपट असेलच…महत्वाचं म्हणजे माधवन आणि दिया या दोघांचाही बॉलिवूडमधला हा डेब्यु चित्रपट होता… आज आपल्याला माहित आहे की हा चित्रपट हिट आहे पण ज्यावेळी हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता तेव्हा तो सुपर फ्लॉप झाला होता हे तुम्हाला माहित आहे का?

तर, २००१ मध्ये क्युट रोमॅंटिक लव्ह स्टोरी असणारा ‘रेहना है तेरे दिल में’ चित्रपट रिलीज झाला… प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठीहा चित्रपट म्हणजे एक गाईड होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही… मात्र, दोघांच्याही अभिनय कारकिर्दितला हा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता… एका मुलाखतीत दिला मिर्झा हिने याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता… दिया म्हणाली होती की, “जेव्हा ‘रेहना है तेरे दिल में’ हा चित्रपट रिलीज झाला होता त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं होतं की हा चित्रपट हिट होईल… पण दुर्दैवाने तो सुपर फ्लॉप झाला जो आम्हाला अपेक्षितच नव्हता…त्यावेळी क्रिटिक्सने, प्रेक्षकांनी माधवनला बॉडी शेम केलं होतं… मलाही फार नावं ठेवली होती… काही आठवडे चित्रपट थिएटरमध्ये थोडाफार चालला आणि निघून गेला…. काही काळानंतर चित्रपटातील गाण्यांनी हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली… कधीही रेडिओ सुरु केला की रेहना है तेरे दिल में मधील सगळी गाणी लागलेली असायची… आणि गाण्यांमुळे खरं तर या चित्रपटाला बऱ्याच वर्षांनी नवी ओळख मिळाली… त्यानंतर जवळपास ८ वर्षांनी माधवनचा मला फोन आला आणि तो म्हणाला की, आपला चित्रपट कल्ट क्लासिक झाला आहे… टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांमध्ये रेहना है तेरे दिल में टॉपवर आहे… ते ऐकू खुप आनंद झाला आणि तेव्हा विचार आला की जेव्हा २००१ मध्ये रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांनी थिएटरमध्येही पाहिला असता तर बरं झालं असतं.. पण असो… काही वर्षांनी का होईना लोकांनी आमच्या कामाची आठवण ठेवली आणि पोचपावती दिलीच…”.
================================
हे देखील वाचा: Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
=================================
दरम्यान, खरंच काही बॉलिवूडचे चित्रपट कथानकामुळे जरी चालले नसले तरी त्यातील गाण्यांनी चित्रपटांना तरुन ठेवलं होतं.. याचा उत्तम उदाहरण म्हणजे इम्रान हाश्मी… त्याचे फारसे चित्रपट गाजले नाही पण त्याच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी आजही सुपरहिट आहेत… एकही गाणं फ्लॉप झालं नाही आहे… आता मात्र, बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांचा दर्जा फारच खालावलेला दिसतो…उडत्या चालीच्या गाणांध्ये शब्द आणि भावनाही हरवल्या आहेत हे देखील तितकंच खरं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi