
Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे चित्रपट म्हणजे कॉमेडीचा एक वेगळाच प्रकार ते प्रेक्षकांसमोर मांडणार हे फिक्स… त्यांच्या अनेक बेस्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ३ इडियट्स (3 Idiots)… या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर, सीन्स, गाणी सगळं काही प्रेक्षकांना तोंडपाठ आहे… इतकंच काय ५ सप्टेंबर ही तारीखही या ‘३ इडियट्स’मुळे फेमस झाली… रॅंचो (Aamir Khan), फरहान (R Madhvan) आणि राजू 9Sharman Joshi) या ३ मित्रांची धमाल कथा या चित्रपटात पाहायला मिळते… या तिघांभोवती फिरणारा प्रत्येक सीन बाप आहे… पण जर का तुम्हाला या चित्रपटातील एक आयकॉनिक सीन ‘३ इडियट्स’साठी लिहिलाच नव्हता असं सांगितलं तर…? विश्वास बसेल? तर, या चित्रपटात मोनाच्या डिलिव्हरीचा क्लायमॅक्स सीन ‘३ इडियट्स’साठी नाही तर दुसऱ्याच एका आयकॉनिक चित्रपटासाठी लिहिला गेला होता…. काय होता हा किस्सा जाणून घेऊयात…(Bollywood Gossips)

‘३ इडियट्स’मधला एक सीन जो चित्रपटाच्या अगदी शेवटी येतो पण रॅंचोची एक कमाल बाजू मांडून जातो.. तो सीन म्हणजे मोनाच्या डिलिव्हरी… प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे कुणीही कॉलेजच कॅम्पसच्या बाहेर जाऊच शकत नाही… आणि इथे मोनाला लेबर पेन सुरु होतं… करणार काय? एक जी फिमेल डॉक्टर आहे करिना कपूर (Kareena Kapoor) ती कॅम्पसमध्ये नसल्यामुळे संपूर्ण बॉईज कॉलेजमध्ये डिलिव्हरी करण्याची जबाबदारी येते रॅंचो आणि त्याच्या मित्रांवर…आता इंजिनियर्स असल्यामुळे जुगाड करुन मोनाची डिलिव्हरी सुखरुप होते… सगळा सीन तर सांगू झाला… आता ओरिजनली हा सीन नेमका कोणत्या चित्रपटासाठी लिहिला गेला होता? तर तो चित्रपट होता राजकुमार हिरानी यांचा डेब्यु चित्रपट ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ (Munnabhai MBBS)… लागला ना शॉक?

हो… २००३ मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्त (Sanjay Dutt) याच्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटासाठी हा सीन लिहिला गेला होता… हा चित्रपट जितका राजकुमार हिरानी यांच्या करिअरसाठी महत्वाचा होता त्यापेक्षा जास्त संजय दत्तसाठी होता… आता का? हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच… असो.. तर झालं असं होतं की, ‘मुन्नाभाई MBBS’ लिहिण्यापूर्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी ३ medical students ची कथा लिहित होते… ती कथा अशी होती की, एका रात्री ३ मित्रांना एक तरुणी स्त्री वेदनेने ग्रासलेली दिसते ती गरोदर असते… आणि ३ मित्र तिची प्रसुती करतात… पण नंतर काही कारणामुळे हा सीन कॅन्सल केला गेला आणि ३ मित्रांऐवजी medical student कॉमन ठेवत तिथे मुख्य नायक मुन्नाभाई आला… आणि तो सीन त्या चित्रपटात वापरला गेला नाही… (Unknown facts Of Bollywood)

================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
=================================
कालांतराने, जेव्हा २००९ मध्ये ‘३ इडियट्स’ राजकुमार हिरानी यांनी आणला त्यावेळी त्या ३ मित्रांचा सीन हुशारीने त्यांनी या चित्रपटात वापरला… आणि या सीनला ३ इडियट्स चित्रपटात योग्य न्याय देखील मिळाला… पण जर का हा सीन ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ चित्रपटात वापरला असता तर काय झालं असतं? आणि नेमका कथेच्या कोणत्या टप्प्यात हा वापरला गेला असता किंवा योग्य वाटला असता असं तुम्हाला वाटतं? कमेंटकरुन आम्हाला तुमचं मत नक्की कळवा…(Entertainment News)