Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?

 Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?
बात पुरानी बडी सुहानी

Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?

by धनंजय कुलकर्णी 10/03/2025

दक्षिणात्य दिग्दर्शक मनीरत्नम यांचा ‘दिल से’ (Dil Se..) हा चित्रपट ११ ऑगस्ट १९९८ या दिवशी प्रदर्शित झाला. Shah Rukh Khan, प्रीती झिंटा आणि मनीषा कोईराला अभिनित हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. विषय वेगळा होता. मुख्य म्हणजे मांडणी वेगळी होती आणि सिनेमाचं संगीत अतिशय अप्रतिम होतं. या चित्रपटात सहा गाणी होती आणि प्रत्येक गाणं वेगळं होतं. संगीतकार ए आर रहमान यांनी प्रत्येक गाण्याला दिलेली ट्रीटमेंट आणि प्रयोग यांची आज देखील चर्चा होते.

या सिनेमातील एका गाण्यात एका ख्यातनाम पार्श्वगायिकेला गायला लावलं नाही तर केवळ बोलायला लावलं! खरंतर गाणाऱ्या व्यक्तीला गावू न देता बोलायला लावणं तसं अवघड असतं. कारण यामध्ये गाण्याची लय बिघडली जाऊ शकते. पण संगीतकार ए आर रहमान यांची एक्सपेरिमेंटल स्टाईल निराळी असते. त्यामुळे त्यांनी ‘दिल से’ या चित्रपटातील या गाण्यात हा प्रयोग केला आणि तो १००% यशस्वी झाला. आज हे गाणं आयकॉनिक सॉंग बनलं आहे. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता नेमका प्रयोग? (Untold stories)

दिग्दर्शक मनीरत्नम कायम वेगळ्या विषयावर चित्रपट देत असतात. मग तो रोजा असो, बॉम्बे असो की गुरु… ‘दिल से’ (Dil Se..) या चित्रपटातील कथानक, त्याची मांडणी आणि त्याचे दिग्दर्शन अफलातून होते. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांचे होते तर चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली होती. या सिनेमातील एका गाण्यात ख्यातनाम पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना गायचे नव्हते किंबहुना संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी, “तू गाऊ नकोस. फक्त यातील काही संवाद बोलून दाखव!” असं सांगितलं. कविता कृष्णमूर्तीसाठी हा एक वेगळा प्रयोग होता. तिच्यासोबत या गाण्यात सोनू निगम यांचा स्वर होता आणि गाणं होतं ‘सतरंगी रे…’  हे गाणं तब्बल साडेसात मिनिटांचे होते.

यातील Kavita Krishnamurthy चा आवाज बऱ्याच जणांना ओळखू आलाच नाही. संगीत दिग्दर्शकाला देखील हेच अभिप्रेत होतं. या सिनेमाच्या तमिळ आणि तेलगू व्हर्जनमध्ये हे गाणं चित्रा आणि श्रीनिवासन यांनी गायलं होतं. ए आर रहमान संगीताच्या दुनियेत कायम वेगवेगळे एक्सपरिमेंट करत असतात त्यातलाच हा एक प्रयोग होता. ‘दिल से’ या चित्रपटातील अन्य गाणी देखील प्रचंड गाजली. आज देखील ती लोकप्रिय आहेत. चल छय्या छय्या छय्या छय्या, (सुखविंदर सिंग स्वप्ना अवस्थी) ऐ अजनबी तू भी कभी (उदित नारायण महालक्ष्मी अय्यर) जिया जले जान जले (लता मंगेशकर). (Dil Se..)

सतरंगी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा किस्सा सांगताना सोनू निगम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “हे गाणं साडेसात मिनिटांचं असल्यामुळे रेकॉर्डिंग सुद्धा खूप वेळ चालले. मी अक्षरशः थकून गेलो होतो.” यात शेवटी एक ओळ त्याला गायची होती ‘मुझे मौत के गोद मे सोने दे….’ सोनू निगम म्हणाले, ”माझा गळा त्यावेळी इतका थकला होता की मला माझा आवाज क्रॅक होईल की काय अशी भीती वाटत होती. म्हणून मी ए आर रहमान यांना म्हणालो “मला दोन तास थोडीशी विश्रांती करू द्या’.” त्यांनी दोन तास विश्रांती घेतली. गळ्याला आराम दिला आणि नंतर ती ओळ गायली. सोनू निगम पुढे म्हणाले, “संगीतकार रहमान गायकाकडून वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळे टेक घेत असतात आणि नंतर त्याचे एकत्रित संकलन करतात. त्यामुळे गाणं बनण्याची त्यांची प्रक्रिया ही सर्वार्थाने वेगळी असते पण फायनल प्रॉडक्ट जे बनतं ते खरोखर लाजवाब असते!”

==============

हे देखील वाचा : Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!

==============

यातील अत्यंत गाजलेलं चल छय्या छय्या छय्या छय्या हे गाणे Malaika Arora आणि शाहरुखवर चित्रित केलं होतं. तामिळनाडूमधील उटीच्या निसर्गरम्य परिसरात निलगिरी एक्स्प्रेसवर चित्रित केले होते. उटी, कुन्नूर आणि कोटागिरी दरम्यान सर्व शूट झाले. सतरंगी रे हे गाणे लडाखमध्ये शूट झाले तर जिया जले जान जले केरळमध्ये चित्रित केले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘दिल से’ (Dil Se..) सिनेमाला १० नामांकने मिळाली होती पैकी सर्वोत्कृष्ट संगीत (ए आर रहमान) सर्वोत्कृष्ट गीतकार (गुलजार), सर्वोत्कृष्ट डेब्यू (प्रीती झिंटा), सर्वोत्कृष्ट गायक (सुखविंदर सिंग), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (संतोष सिवन), सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी (सरोज खान) हे सहा पुरस्कार मिळाले.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: A R Rehman actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News dil se.. Entertainment Featured Kavita Krishnamurthy Manisha Koirala Preeti Zhinta shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.