Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

दिलीपकुमारने उद्योगपती जे आर डी टाटांना ओळखलेच नाही !
काही प्रसंग काही घटना माणसाला पुन्हा एकदा जमिनीवर आणत असतात. असाच एक प्रसंग अभिनेता दिलीप कुमार यांच्याबाबत घडला होता. या प्रसंगाचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेले आहे. ही घटना साठ च्या दशकातील आहे. तेव्हा दिलीप कुमार स्टार म्हणून लोकप्रिय झाले होते. देश विदेशात त्यांची मोठी लोकप्रियता निर्माण झाली होती. त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठे उत्सुक असत. (Dilip Kumar)
याच काळात दिलीप कुमार (Dilip Kumar) भारतातच एका विमान प्रवासाने मुंबईहून दिल्लीला जात होते. आपल्या विमानात दिलीप कुमार आहेत हे कळाल्यावर विमानातील सर्व प्रवासी मोठे आनंदी झाले आणि प्रत्येक जण त्याच्यासोबत येऊन त्याची स्वाक्षरी घेऊ लागले. त्यांच्याशी बोलू लागले. दिलीप कुमार यांच्यासाठी हा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा प्रसंग होता. फ्लाईट मधील प्रत्येक जणच त्याच्याशी बोलायला उत्सुक होते. दिलीप कुमारचा ‘इगो’ यामुळे खूप सुखावून चालला होता. पण दिलीप कुमारच्या शेजारच्या सीटवर एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांना मात्र याचे काहीच वाटत नव्हते किंबहुना त्यांचे लक्ष देखील या सगळ्या प्रकाराकडे नव्हते.

दिलीपकुमार (Dilip Kumar) यांना हे थोडं विचित्र वाटलं. कारण विमानातील सर्व प्रवासी जेव्हा त्यांच्याकडे येऊन त्यांची सही घेत होते त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते त्यांच्याशी बोलत होते त्यावेळी हे वृद्ध गृहस्थ त्यांच्याकडे पहात देखील नव्हते! ते आपल्या मासिकात डोके खुपसून वाचत बसले होते. दिलीप कुमारला ही बाब खूप खूप खटकत होती. ते वृध्द गृहस्थ हिंदी मासिक वाचत असल्याने ते शंभर टक्के भारतीय च होते याची खात्री पटत होती. दिलीपकुमार ला हे खूप अनपेक्षित आणि अचंबित करणारे होते.
फ्लाईट सुरू झाले. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर जाऊन बसले. शेजारी बसलेले वृध्द गृहस्थ दिलीप कुमारकडे (Dilip Kumar) कटाक्ष टाकून ‘हॅलो’ असे म्हटले. दिलीपने देखील त्यांना हॅलो म्हटले. चला काहीतरी संबोधन सुरू झाले आहे असे पाहून दिलीप कुमारने त्यांना थोडंसं रागातच विचारले,” तुम्ही हिंदी सिनेमा पाहत नाहीत का?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले,” नाही. खूप लहानपणी मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता. अलीकडे अनेक वर्षात पाहिलाच नाही.” त्यावर ते गृहस्थ म्हणाले ,” बाय द वे, तुम्ही काय करता?” तेव्हा दिलीप कुमार म्हणाले,” मी सिनेमात काम करतो.” ते म्हणाले,” ठीक आहे. तुम्ही सिनेमात नेमकं काय काम करता?” आता दिलीप कुमार ला पुन्हा राग आला ते म्हणाले मी सिनेमात अभिनेता आहे.” त्यावर ते गृहस्थ म्हणाले,” गुड जंटलमन. ऑल द बेस्ट.” विमान दिल्लीला पोहोचले. आणि लँड झाले.
विमानातून उतरताना दिलीप कुमारने त्या वृद्ध गृहस्थांना हस्तांदोलन केले आणि म्हणाले,” आपके साथ सफर अच्छा हुआ. गुड बाय. मेरा नाम दिलीप कुमार (Dilip Kumar) है.” त्यावर त्या वृध्द गृहस्थांनी शेक हँड करत सांगितले,” ओके . मेरा नाम जे आर डी टाटा है.” आता आश्चर्य होण्याची पाळी दिलीप कुमार यांची होती. कारण ते नाव ऐकल्यानंतर ते एकदम चक्रावून गेले. कारण भारतातील सर्वात मोठा उद्योगपती त्यांच्यासोबत होते. त्यांनी पुन्हा एकदा त्यांना शेक हँड केला आणि ओशाळल्यागत म्हणाले,” माफ करा. मी तुम्हाला खरोखर ओळखले नाही.” जे आर डी टाटा यांनी खांद्यावर थोपटत सांगितले,” नो प्रॉब्लेम . मी तरी तुम्हाला कुठे ओळखले?” हा प्रसंग दिलीप कुमार यांनी त्यांच्या जास्त द सबस्टन्स अँड द शाडो या आत्मचरित्रात लिहिला आहे.
==========
हे देखील वाचा : किस्सा : संजूबाबाच्या बारशाचा !
===========
त्यात ते लिहितात जे आर डी टाटा यांच्यासोबतची ही मुलाखत मी आयुष्यभर विसरू शकत नाही या घटनेनंतर मी एक शिकलो माणसाची किंमत पैशाने नाही तर त्याच्या साधेपणाने होत असते.त्या काळात आजच्या इतका मिडिया नसल्याने आणि टाटा कुटुंबीय पहिल्या पासून प्रसिद्धी पासून दूर राहत असल्याने जे आर डी टाटा यांना साठ च्या दशकात फारसे कुणी ओळखत नव्हते अगदी दिलीपकुमार सुध्दा !