Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

Dilip Prabhavalkar : उत्कृष्ट अभिनेता ते प्रतिभावान लेखक!
फार्मास्युटिकल कंपनीतील एक माणूस अभिनयाकडे वळला आणि जीवनात आनंदी राहण्याचा डोसच जणून काही त्याने आपल्या अभिनय आणि लिखाणातून प्रेक्षकांना दिला… मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरही ४० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar)… सध्या ‘दशावतार’ (Dashavatar movie) या चित्रपटामुळे त्यांच्या नावाची सगळीकडेच चर्चा आहे… या चित्रपटात त्यांनी साकारलेला बाबुली मेस्त्री म्हणजे प्रभावळकरांच्या आजवरच्या अजरामर पात्रांमध्ये आणखी एक पडलेली भरच म्हणाली लागेल… दिलीप प्रभावळकर एक उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच; पण तितकंच ताकदीचं त्यांचं लिखाणही आहे… आज जाणून घेऊयात प्रभावळकरांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल…(Entertainment news)

दिलीप प्रभावळकर यांनी फार पूर्वी एका मुलाखतीत मी अपघाताने लेखक झालो असं म्हटलं होतं… “माझ्या छंदाचा व्यवसाय झाला”, असं मनोगत त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं… दिलीप प्रभावळकरांनी अभिनय करता करता लिखाण सुरु केलं…त्यांच्या साहित्य सेवेची सुरुवात एका पाक्षिकात झाली… क्रिकेटविषयी लिहिलेल्या कॉलमवरून ‘गुगली’ नावाचं त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं… त्यानंतर लहान मुलांना आवडणारं ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक तुफान गाजलं.. पण ते पात्र आणि ‘बोक्या सातबंडे’ हे पुस्तर लिहिलं आहे दिलीप प्रभावळकर यांनी… इतकंच नाही तर संपादकांच्या आग्रहाखातर प्रभावळकरांनी टिपरे कुटुंबाची रोजनिशी या स्वरुपात अनुदिनी हे सदर लिहिलं होतं.. पुढे यावर केदार शिंदे यांनी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका दिग्दर्शित केली… (Books of dilip Prabhavalkar)

इतकंच नाही तर ‘अनुदिनी’, ‘अवतीभोवती’, ‘आवाज दिलीप प्रभावळकरांचा’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी (नाटकाचं लिखाण), ‘हसवा फसवी’, ‘मी असा (कसा) झालो?’, ‘माझ्या धमाल गोष्टी’, ‘हसगत’; ही पुस्तकं दिलीप प्रभावळकर यांनी सर्व वयोगटातील वाचकांसाठी लिखाण केलं आहेच; परंतु, बालसाहित्यत विशेष पुस्तक लिहिली आहेत….. तसेच, ‘अनपेक्षित’ ही स्वत:ची आत्मकथा देखील प्रभावळकरांनी लिहिली असून यात त्यांचा संपूर्ण सिनेकारकिर्दीचा प्रवास त्यांनी लिहिला आहे…
================================
=================================
मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका तुफान गाजल्या… ‘झपाटलेला’तील ‘तात्या विंचू’, ‘चौकट राजा’तील नंदू, ‘पछाडलेला’तील ईनामदार भूसनळे अशी अनेक अजरामर पात्र त्यांनी साकारली… मराठी दूरचित्रवाणीवर ‘आबा गंगाधर टिपरे’ ही त्यांची ओळख नावारुपास आली.. तर, ‘चिमणराव -गुंड्याभाऊ’ मालिकेतील त्यांची ‘चिमणराव’ भूमिका लोकप्रिय झाली… तर,रंगभूमीवरील, ‘हसवा फसवी’, ‘वासूची सासू’, ‘पत्रा पत्री’ अशी अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिकाही फार लोकप्रिय झाल्या… वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी साकारलेला ‘दशावतार’ चित्रपटातील बाबूल मेस्त्री देखील आता त्यांच्या लोकप्रिय पात्रांमध्ये समाविष्ट झाला आहे यात शंकात नाही… (Dilip Prabhavalkar movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi