
Dilip Prabhavalkar : “सचिन पिळगांवकर मला सिनीयर आहे…”
मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य आणि मालिका विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) सध्या दशावतार चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहेत… वयाच्या ८१व्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी आणखी एक उत्कृष्ट भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केली आहे… ‘दशावतार’मध्ये (Dashavatar movie) प्रभावळकरांनी बाबुल मेस्त्री हे पात्र साकारलं आहे… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल बोलताना ते मला सिनियर आहेत असं म्हटलं आहे… नेमकं प्रभावळकर काय म्हणाले जाणून घेऊयात…

एबीपी माझाच्या कट्ट्यावर ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाची टीम सहभागी झाली होती.. यावेळी दिलीप प्रभावळकर यांना ‘सचिनला तुम्ही सीनिअर आहात का? असा प्रश्न विचारल्यावर दिलीप प्रभावळकरांना आधी वाटलं सचिन तेंडुलकर… मग ते म्हणाले की, “नाही मी त्याला सीनिअर नाही. कारण ‘हा मार्ग एकला’ १९६२ मध्ये केला होता… तेव्हा मी कामच करत नव्हतो. मी अगदी विसाव्या वर्षी नाही तर जरा उशिरा काम सुरु केलं… अभिनयाच्या बाबतीत तो मला सीनिअर आहे… त्याने वयाच्या चौथ्या वर्षापासून चित्रपटात काम करायला सुरु केलं होतं…”(Dilip Prabhavalkar movie)

दिलीप प्रभावळकरांनी १९८१ मध्ये ‘एक डाव भूताचा’ चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात केली होती.. तर, विजय तेंडूलकरांच्या लोभ नसावा ही विनंती या नाटकातील त्यांचं काम प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं होतं… ४० वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या दिलीप प्रभावळकरांच्या बऱ्याच भूमिका गाजल्या… ‘झपाटलेला’, ‘चौकट राजा’, ‘छक्के पंजे’, ‘खिलोना बना खलनायक’, ‘बेकाबू’, ‘चुपके से’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली…(Entertainment news)
================================
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi